विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे. या तिसऱ्या दिवशी विधानसभा अध्यक्षांच्या निवडीवरुन चर्चा होण्याची शक्यता होती. दरम्यान यासंदर्भात आज विधानसभा कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली. यावेळी विधानसभेच्या अध्यक्षपदाच्या निवडी संदर्भात चर्चा करण्यात आली.
अध्यक्षपदाची निवडणूक जाहीर
या झालेल्या बैठकीत विधानसभा अध्यक्षपद निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार, विधानसेभेच्या अध्यक्षपदासाठी सोमवारी २७ डिसेंबर रोजी अर्ज दाखल होणार आहे. यासह मंगळवारी, २८ डिसेंबर रोजी अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे.
२८ डिसेंबरला अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार
विधानसभा अध्यक्ष निवडीच्या नियमात बदल केल्यानंतर या पदासाठी आज, शुक्रवारी निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. या निर्णयानुसार, विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी म्हणजे २८ डिसेंबर रोजी निवडणूक होणार आहे. तसेच आज अध्यक्षपदाची निवडणूक जाहीर झाली असून त्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत सोमवार, २७ डिसेंबरपर्यंत असणार आहे. त्यानंतर २८ डिसेंबर रोजी दुसऱ्या दिवशी निवडणूक होणार आहे.
या नावाची सर्वाधिक चर्चा
विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी राज्य सरकारने नियमावलीत बदल केला आहे. त्यामुळे प्रत्यक्ष मतदाना ऐवजी आवाजी मतदानाने यंदा निवडणूक होणार आहे. दरम्यान, विधानसभा अध्यक्षपदाच्या शर्यतीत काँग्रेसकडून तीन नावे आहेत. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विद्यमान ऊर्जा मंत्री नितीन राऊत, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आणि भोरचे आमदार संग्राम थोपटे यांची नावे या पदासाठी चर्चेत आहेत. त्यामध्ये सर्वाधिक थोपटे यांच्या नावाची चर्चा असल्याचे सांगितले जात आहे
Join Our WhatsApp Community