प्रदूषणाच्या बाबतीत चंद्रपूर शहराचा पहिला क्रमांक लागतो. चंद्रपूरमध्ये पर्यावरणाची हानी झाली आहे. पर्यावरणाच्या झालेल्या या हानीमुळे प्रदूषणाचा कळस गाठला आहे. पर्यावरण हानीचा आरोग्यावर होणारा परिणाम अभ्यासण्यासाठी एक नमुना सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणातून धक्कादायक निकाल हाती आला आहे.
प्रदूषणामुळे गंभीर परिस्थिती
चंद्रपुरात सर्वेक्षणाला प्रतिसाद देणाऱ्या ९४ टक्के लोकांनी वायू प्रदूषण घातक असल्याची माहिती दिली. ७५ टक्के लोकांनी वैयक्तिक आजाराची कारणे प्रदूषण असल्याचे म्हटले. ६७ टक्के लोकांनी प्रदूषणामुळे त्वचा विकार असल्याची माहिती दिली आहे. ५८ टक्के लोकांनी आपले श्वसनविकार प्रदूषणामुळे असल्याचे मान्य केले. डोळ्याच्या आजारांशी संबंधित विकार ५२ टक्के लोकांनी मान्य केले. वर्षभरातील किमान १० दिवस पर्यावरणीय आजारामुळे आपण कामावर जाण्यापासून वंचित राहिल्याचे लोकांकडून सांगण्यात आले. चंद्रपुरात सतत गोळ्या खाऊनच जगावे लागते असे मत ४० टक्के लोकांनी मांडले. चंद्रपुरातील ३६ टक्के नागरिक हिवाळ्यात आजारी होतात. घातक प्रदूषण आणि खालावलेले जीवनमान यामुळे चंद्रपुरात मालमत्तांची किंमत देखील मातीमोल होत चालल्याचे ६९ टक्के लोकांचे मत आहे.
खोटा अहवाल सादर केला जातो
इतकच नाही तर, पिण्याचे पाणी सुद्धा प्रदूषित असल्याचे ८३ टक्के लोकांनी सांगितले आहे. गडचांदूरात मोठ्या प्रमाणात सिमेंटच्या धुळीचे कण घराच्या छतावर, अंगणात, झाडांवर, वाहनांवर रोज साचत आहेत. प्रदूषण वाढल्यानं चंद्रपूरकरांमध्ये श्वसनाचे आजार वाढीस लागले आहे. त्यामुळे या शहरातील लोक हतबल होऊन, आपलं घर सोडून जात आहेत. मात्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून अद्याप लक्ष दिले जात नाही. वायू प्रदूषणाचा खोटा अहवाल तयार करुन शासनाला पाठवण्याचे काम प्रदूषण नियंत्रक मंडळाचे अधिकारी करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. सिमेंट कंपन्यातील वायू प्रदूषण कमी करण्याची मागणी करण्यात येत आहे. अन्यथा शासनाच्या विरुद्ध प्रदूषणाविरोधात मोठे जनआंदोलन उभारण्याचा इशारा आशिष देरकर यांनी निवेदनातून दिला आहे. वायू प्रदूषणाचा खोटा अहवाल तयार करुन शासनाला पाठवण्याचे काम प्रदूषण नियंत्रक मंडळाचे अधिकारी करत असल्याचा आरोप केला आहे.
( हेही वाचा: विधान भवनात कच-याचा ढिग…)
Join Our WhatsApp Community