प्रवाशांनो लक्ष द्या! रविवारी ‘या’ मार्गावर असणार मेगाब्लॉक

158

सुट्टीच्या दिवशी अनेक जण फिरण्यासाठी घराबाहेर पडतात, पण दर रविवारी मुंबईत लोकलचा मेगाब्लॉक असल्यामुळे प्रवाशांचा खोळंबा होतो. मध्य रेल्वे, मुंबई विभागात २६ डिसेंबर रोजी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यात येणार आहेत. यासाठी उपनगरीय विभागांवर मेगा ब्लॉक कार्यान्वित करण्यात येणार आहे.

मध्य रेल्वे (मेन लाईन)

  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि विद्याविहार अप व डाऊन धीम्या मार्गावर सकाळी १०.५५ ते दुपारी ३.५५ वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे.
  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथून सकाळी १०.४८ ते दुपारी ३.३६ या दरम्यान सुटणाऱ्या डाऊन धीम्या मार्गावरील सेवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळविल्या जातील. या सेवा भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला या स्थानकावर थांबतील व विद्याविहार येथे पुन्हा डाऊन धीम्या मार्गावर वळविण्यात येतील.
  • घाटकोपर येथून सकाळी १०.४० पासून दुपारी ३.५२ दरम्यान सुटणाऱ्या अप धीम्या मार्गावरील गाड्या विद्याविहार ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळविण्यात येतील. या गाड्या कुर्ला, शीव, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा या स्थानकावर थांबतील.
  • ब्लॉक कालावधीत मस्जिद, सँडहर्स्ट रोड, चिंचपोकळी, करी रोड आणि विद्याविहार स्थानकांवर सेवा उपलब्ध होणार नाहीत.

हार्बर लाईन

  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – चुनाभट्टी / वांद्रे डाउन हार्बर मार्गावर सकाळी ११.४० ते सायंकाळी ४.४० पर्यंत आणि चुनाभट्टी/वांद्रे – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अप हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० पर्यंत मेगाब्लॉक असणार आहे.
  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई/वडाळा रोड येथून सकाळी ११.१६ ते सायंकाळी ४.४७ पर्यंत वाशी/बेलापूर/पनवेल करीता सुटणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.४८ ते सायंकाळी ४.४३ वाजेपर्यंत वांद्रे/गोरेगाव करीता सुटणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील.
  • पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी ९.५३ ते दुपारी ३.२० पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा आणि गोरेगाव/वांद्रे येथून सकाळी १०.४५ ते सायंकाळी ५.१३ पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील.
  • तथापि, ब्लॉक कालावधीत पनवेल आणि कुर्ला (प्लॅटफॉर्म क्र. 8) दरम्यान विशेष सेवा चालविल्या जातील.
  • हार्बर मार्गावरील प्रवाशांना ब्लॉक कालावधीत सकाळी १०.०० ते संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत मेन लाईन आणि पश्चिम रेल्वेवरून प्रवास करण्याची परवानगी आहे.

( हेही वाचा : नाताळ आणि नववर्षाच्या सेलिब्रेशनवर टांगती तलवार! )

प्रशासनाने केली व्यक्त दिलगिरी

हा मेंटेनन्स मेगा ब्लॉक्स पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहेत. प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासन दिलगिरी व्यक्त केली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.