मंत्री अनिल परब यांनी दापोली येथील मुरुड समुद्र किनाऱ्यावर २ अनधिकृत रिसॉर्ट बांधले. असा आरोप केल्यावर भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी जून २०२१ मध्ये या दोन्ही अनधिकृत रिसॉर्टची पाहणी केली होती, त्याचा अहवाल केंद्र सरकारने महाराष्ट्र सरकारला पाठवला होता, त्या अंतर्गत अनिल परब यांना कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली आहे. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात हा रिसॉर्ट पाडण्याचे अंतिम आदेश दिले जातील, असा विश्वास भाजप नेते किरीट सोमय्या यांनी व्यक्त केला आहे.
समुद्र किनाऱ्यावरील ना विकास क्षेत्र (No Development Zone) सीआरझेड सीमेच्या आत,
i. साई रिसॉर्ट एन एक्स, गाव मुरुड, दापोली
ii. सी कौंच बीच रिसॉर्ट , गाव मुरुड, दापोली
• या नोटीस मध्ये १५ दिवसांच्या आत कारणे दाखवा नोटीसचे उत्तर देण्याचे सांगण्यात आले आहे.
• सीआरझेड नियमांचे उल्लंघन करून ना विकास क्षेत्र (No Development Zone) मधील ही दोन्ही बांधकामे आहे.
• NCSCM, SCZCM यांचे सीआरझेड ३ संबंधीचे नकाशे हे साई रिसॉर्ट एन एक्स, सी कौंच बीच रिसॉर्ट वर अनिल परब यांना पाठवण्यात आले आहे.
( हेही वाचा : प्रसूतिगृह बालमृत्यू प्रकरण, ‘त्या’ वैद्यकीय कंपनीचे कंत्राट तातडीने रद्द करा! )
• साई रिसॉर्ट एन एक्स हे दोन मजली अनधिकृत रिसॉर्ट आहे व सी कौंच बीच रिसॉर्टमधील तळ मजला, पहिला मजला आणि दुसऱ्या मजल्यावरील स्ट्रक्चर यात कव्हर करण्यात आले आहे.
• या रिसॉर्ट मध्ये प्रवेश करण्यासाठी समुद्राच्या वाळूतून अनधिकृत रस्ता दिला गेला आहे.
• सीआरझेड नोटिफिकेशन २०११ चे कलम ८ च्या अंतर्गत ही नोटीस देण्यात आली.
गेल्या २/३ वर्षात हे बांधकाम करण्यात आले, याचे सॅटेलाईट नकाशे व पुरावेही नोटीस सोबत देण्यात आले आहेत.
Join Our WhatsApp Community