‘जो हिंदू हित की बात करेगा वही देशपर राज करेगा !’

122

२३ डिसेंबर या दिवशी विधानसभेच्या सभागृहात काही सदस्यांकडून सनातन संस्थेवर बंदी घालण्याची मागणी केली जात आहे. आतंकवादी कारवाया करणार्‍या आतंकवाद्यांची शिक्षा माफ करावी, अशी राष्ट्रपतींना पत्र पाठवणारे विधिमंडळातील काही सदस्यच सनातन संस्थेवर बंदी घालण्याची मागणी करत आहेत, हे दुर्दैवी आहे. महाराष्ट्रात रझा अकादमी संघटनेकडून मोर्चे काढले जात असतांनाही रझा अकादमीवर बंदी घालण्याची मागणी केली जात नाही. त्यामुळे सनातन संस्थेवर बंदी घालण्याऐवजी रझा अकादमीवर प्रथम बंदी का घातली जात नाही ?’, असा घणाघात भाजपचे आमदार मंगलप्रभात लोढा यांनी विधानसभेत केला.

वर्ष २०२१-२२ या वर्षीच्या पुरवणी मागण्यांवर चर्चेच्या वेळी ते बोलत होते. या वेळी मंगलप्रभात लोढा यांनी सनातन संस्थेवर बंदी घालण्याच्या मागणीचा कडाडून विरोध केला, तसेच ‘जो हित की बात करेगा वही देशपर राज करेगा’, अशी जोरदार घोषणा सभागृहात केली.

मंगलप्रभात लोढा यांची भूमिका

  • सनातन संस्थेवर बंदीची भाषा करणार्‍यांंना कधी रझा अकादमीची कधी आठवण होते का? सनातन संस्थेवर बंदी करणार्‍यांना कधी आठवते का की, बंगालमध्ये एखादी घटना घडल्यानंतर देशात काही न होता महाराष्ट्रात ठिकठिकाणी मोर्चे (जुलूस) काढले जातात. हे जुलूस काढणारे लोक रझा अकादमी आणि जमातीचे लोक आहेत.
  • प्रथम जमात आणि रझा अकादमीवर बंदी घातली पाहिजे, असे सनातन संस्थेवर बंदी घालण्याची मागणी करणार्‍यांच्या मनातील हिंदुत्व जागृत झाले नाही.
  • गुगलवर सनातन संस्था सर्च केल्यानंतर प्रथम ‘आरती’चे चित्र येईल; मात्र रझा अकादमीच्या संकेतस्थळावर सर्च केल्यानंतर हुतात्मा बोधचिन्हाला लाथ मारल्याचे चित्र दिसून येते. (या वेळी सदस्यांनी ‘शेम शेम’ असे म्हटले) रझा अकादमीच्या लोकांना संरक्षण देण्याचे काम कोण करते ? रझा अकादमीवर बंदी घालू शकत नाही; पण सनातन संस्थेवर बंदी घालण्याची मागणी केली जाते.
  • मला येथे एका गोष्टीची लाज वाटते की, वर्ष १९९३ मध्ये मुंबई येथे झालेल्या बाँम्बस्फोटात १० सहस्र लोकांना ठार मारण्यात आले होते, त्या वेळी सर्वोच्च न्यायालयाने बाँम्बस्फोट करणार्‍यांना फाशीची शिक्षा दिली, तेव्हा या निर्णयामुळे आनंदी होण्याऐवजी काही जणांनी राष्ट्रपतींना पत्र पाठवून बाँम्बस्फोटातील आरोपी आणि दाऊदच्या मुडद्यांना माफ केले जावे, अशी मागणी केली. ते माफी मागणारे आजही विधानसभेत बसलेले आहेत. त्या वेळी १२ लोकांनी या पत्रावर स्वाक्षरी केली होती. ते १२ लोक आज विधानसभेत सदस्य म्हणून बसले आहेत, त्यांना प्रथम विधानसभेतून हाकलून लावा आणि त्यानंतरच सनातन संस्थेविषयी बोलावे, असे त्यांनी ठणकावून सांगितले. (या वेळी काही सदस्यांनी त्या १२ लोकांची नावे विचारली, तेव्हा लोढा यांनी ती नावे तुम्हाला माहीत आहेत, तुम्हीच शोधा, असे त्यांना सांगितले)
  • मी जे काही बोलत आहे ते विचारपूर्वक बोलत आहे. ते रेकॉर्डवर येणार आहे. काही सदस्य मोठ्या आवाजात बोलायला लागल्यानंतर लोढा यांनी ‘विधानसभा अध्यक्षांनी मला संरक्षण द्यावे’, अशी मागणी केली.
  • मी जोरात बोलेन आणि ते तुम्हाला ऐकून घ्यावे लागेल. ‘जो हिंदू हित की बात करेगा वही देशपर राज करेगा’ महाराष्ट्र आणि मुंबई येथे रहाणार्‍या लोक आणि संस्कृती यांचे संरक्षण अन् त्यांचा सन्मान करण्याचे दायित्व माझे आहे. त्याविषयी सदनात चर्चा केली पाहिजे.

( हेही वाचा : संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना चपराक! बडतर्फीच्या कारवाईस स्थगिती नाहीच )

  • गणेशोत्सव आणि नवरात्री सणांच्या वेळी लोकांच्या संख्येला प्रतिबंध घातले जाते. यात्रेतील लोकांच्या संख्येला प्रतिबंध घातले जाते. वर्षातून एकदाच हे सण येतात; मात्र प्रत्येक शुक्रवारी संपूर्ण रस्त्यावर नमाज पठण करणार्‍यांना प्रतिबंध केले जात नाही.
    सर्वोच्च आणि उच्च न्यायालयांचा आदेश असतांनाही त्याचे पालन केले जात नाही.
  • देशातील संस्कृती वाचली, तर देश वाचेल आणि देश वाचला, तर आपण वाचू शकतो. जे काश्मीर आणि बंगाल येथे होत आहे, ते महाराष्ट्रात होण्यास वेळ लागणार नाही. गृहमंत्र्यांनी संवेदनशील विषय गांभीर्याने घ्यावे. छोट्या छोट्या गोष्टी असून त्यामध्ये आत बॉम्ब लपवले आहेत.
  • मुंबई येथे कोळी समाजाचा मासे विकण्याचा मुख्य ९० टक्के व्यवसाय होता, आता कोळी समाजाला बाहेर पडावे लागले आहे. त्यांच्याकडे हा व्यवसाय राहिलेला नाही. मुंबई येथील १५ व्यवसाय ‘एका जाती’च्या लोकांनी स्वतःच्या कह्यात घेतले आहेत. पुढे येणार्‍या काळात मुंबई आणि संस्कृती यांचे संरक्षण कसे करता येईल, याविषयी सरकारला विचार करणे आवश्यक आहे.
  • मंदिर आणि वक्फ मंडळाची भूमी हडप करण्यात आली आहे. वक्फ मंडळाची जवळपास १० सहस्र एकर भूमी हडप करण्यात आली आहे. यासाठी समितीची नियुक्ती करून १५ वर्षांतील घोटाळ्याची चौकशी करावी. प्रत्येक मंदिरांवर धर्मादाय आयुक्तांच्या वतीने ५० प्रतिबंध लावले जातात. प्रत्येकवेळी छोट्या छोट्या कारणासाठी मंदिरांतील विश्‍वस्तांना ५ वेळा जावे लागते; मात्र वक्फ मंडळावर कुणाचे नियंत्रण आहे का ? गेली अनेक वर्षे वक्फ हक्क मंडळाकडे समिती आणि अध्यक्ष नाही. तिकडे मात्र कुणी लक्ष देत नाही.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.