बेस्टच्या आगारांच्या बेसमेंटसह मोकळ्या जागा वाहनतळासाठी वापरा!

97

बेस्ट उपक्रमाचा प्रतिवर्षी वाढत जाणारा तोटा विचारात घेता यावर नियंत्रण आणण्यासाठी प्राथमिक स्तरापासून कार्यरत असणारी समिती स्थापन करावी अशी सूचना स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी बेस्ट अर्थसंकल्पीय भाषणाद्वारे केली आहे. प्रत्येक आगारांमध्ये बेसमेंट पार्किंगच्या माध्यमातून महसूल प्राप्त करण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करतानाच मुंबईतील बहुतांश बेस्ट डेपो रेल्वे स्थानकाजवळ आहेत. त्याठिकाणी खासगी वाहनांना सकाळी दहा ते सायंकाळी सहा या वेळेत वाहनतळासाठी जागा उपलब्ध करून दिली जावी अशीही सूचना केली आहे.

स्थायी समिती अध्यक्षांची सूचना

बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रमाच्या (बेस्ट) सन २०२२-२३ या वर्षाच्या अर्थसंकल्प स्थायी समिती अध्यक्षांना सादर करण्यात आला. यावर बोलतांना स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी वीजचोरी व वीज गळतीमुळे बेस्ट उपक्रमाचे मोठे नुकसान होते, तरी अशा प्रकारची चोरी शोधून काढण्यासाठी दक्षता पथक स्थापन करून युध्दपातळीवर प्रयत्न सुरु करणे आवश्यक आहे. सदोष वीजमापके, वीजचोरी, थकबाकी वसुली यावर कडक कारवाई करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच फिरत्या वीज भरणा केंद्रालाही वाढती मागणी असल्याने प्रशासनाने अधिकाधिक मोबाईल व्हॅन उपलब्ध कराव्यात अशी सूचना केली. जुन्या वीज मापकांमुळे उपक्रमाच्या उपत्नांमध्ये घट होत असून न वीज प्रणालीची वीज मापके बसवण्याबाबत उपक्रमाने अग्रक्रमाने कार्यवाही केली जावी तसेच सौर ऊर्जेचा वापर करत खासगी इलेक्ट्रीक वाहनांसाठी जागोजागी चार्जिंग स्टेशन्स उभारले जावेत. याबरोबरच टाटा कंपनीवरच अवलंबून न राहता बेस्ट उपक्रमाने स्वत: अद्ययावत यंत्रणा उभारुन वीज निर्मिती करणेही आवश्यक असल्याचे म्हटले आहे.

( हेही वाचा : मुंबईतील एकाही रुग्णालयाचे खासगीकरण नको! )

भूखंडाच्या व्यावसायिक तत्वावर वापर करण्यासाठी प्रयत्न करावा

प्रिपेड मीटर व स्मार्ट मीटर एका वर्षाच्या कालावधीत बदलणे शक्य होईल अशाप्रकारे नियोजन करावे तसेच विद्युत पुरवठा क्षेत्रातील तज्ज्ञांची समिती स्थापना केली जावी अशीही सूचना केली आहे. मुंबई शहर आणि उपनगरामध्ये मोक्याच्या ठिकाणी असलेली बसआगारे, सेवकवर्ग निवासस्थाने याठिकाणी जाहिरातीच्या माध्यमातून महसूल प्राप्त करण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावे तसेच बेस्ट उपक्रमाच्या मोकळ्या भूखंडाच्या व्यावसायिक तत्वावर वापर करण्यासाठी प्रयत्न करावे अशाही सूचना केल्या आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.