पॅथॉलॉजी लॅबचा कर्मचारीच सुपर स्प्रेडर, 12 जणांना केलं बाधित

110

कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉन सध्या जगभरात धुमाकूळ घालत आहे. ओमायक्रॉनचे रुग्ण वाढत असून, भारतात तिस-या लाटेचा धोका वाढला आहे. सध्या महाराष्ट्र राज्य ओमायक्रॉनचे हॉट स्पॉट झाले आहे. त्यातच आता दादर येथील लाल पॅथ लॅबमधील 12 कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. या घटनेमुळे खळबळ उडाली असून, महापालिकेच्यावताने पॅथॉलॉजी लॅब सील करण्यात आली आहे .

नारायण विजय राणे या लॅबमध्ये काम करणा-या कर्मचा-याला कोरोनाची लागण झाली होती. महापालिकेच्या तपासणीत या लॅबमध्ये काम करणा-या 12 कर्मचा-यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. यानंतर आता दादर पश्चिमेला असलेली लाल पॅथ लॅब महापालिकेकडून सील करण्यात आली आहे.

 ( हेही वाचा :आता नितेश राणे म्हणतात, भंगारात आढळणारी ही प्रजाती ओळखा पाहू! )

संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध सुरु

लॅबमध्ये काम करणाऱ्या नारायण विजय राणे यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर महापालिकेने त्याच्या संपर्कात आलेल्या 39 जणांचा शोध सुरू केला आणि महापालिका लॅब पर्यंत पोहोचली. लॅब मधील कर्मचाऱ्यांची तपासणी केली असता 19 पैकी 12 जण कोरोना पाॅझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहेत.

कोरोना बाधितांची संख्या वाढतेय

कोरोना विषाणू संसर्गाचे रुग्ण पुन्हा एकदा वाढू लागले आहेत. शुक्रवारी मुंबईथ 683 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर दिवसभरात 267 कोरोना रुग्णांना बरं झाल्यावर डिस्चार्ज देण्यात आला आहे. मुंबईत एकूण 7 लाख 47 हजार 258 कोरोना रुग्ण बर झाले आहेत. मुंबईत सध्या 3 हजार 227 सक्रिय रुग्ण आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.