राज्याच्या हिवाळी अधिवेशनाला बुधवापासून सुरुवात झाली. पहिल्याच दिवसापासून अधिवेशन वादळी ठरलं आहे. सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षात जोरदार टोलेबाजी पाहायला मिळत आहे. भाजपाचे मंत्री सुधिर मुनंगटीवार यांनी ब-याचदा सत्ताधारी पक्षाला कोंडीत पकडताना दिसत आहेत. शुक्रवारी विधीमंडळात बोलताना मुनगंटीवारांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना तुमचा पगार पण एवढा नाही हो, जितका खर्च पेंग्विनवर केला जातोय असं म्हणत निशाणा साधला होता. आता त्यांनी उदाहरणाद्वारे अप्रत्यक्षरित्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका केली आहे. बापाला दिलेला शब्द पाळण्यासाठी शेजारच्यांची मार्कशीट चोरायची नसते, त्यासाठी मेहनत करायची असते, असं मुनगंटीवार म्हणाले. त्यांच्या या खोचक विधानानंतर विधीमंडळात एकच हशा पिकला.
'बापाला दिलेला शब्द पाळण्यासाठी शेजारच्यांची मार्कशीट चोरायची नसते, त्यासाठी मेहनत करायची असते.! pic.twitter.com/EdQmITg5zg
— Sudhir Mungantiwar (@SMungantiwar) December 25, 2021
उदाहरणाद्वारे अप्रत्यक्षरित्या टोला
आमच्याही परिसरात एक मुलगा होता, त्याला पोलीस पकडायला आले, त्याचा बाप म्हणाला माझ्या मुलाला का पकडताय? पोलीस म्हणाले की, तुमच्या मुलाने बाजूच्या एमबीबीएस विद्यार्थ्याची मार्कशीट चोरुन, त्यावर स्वत:चं नाव आणि नंबर टाकला. मग, बापाने त्या मुलाला विचारलं, अरे तु त्याची मार्कशीट का चोरली ? तर तो मुलगा म्हणे, मी तुम्हाला शब्द दिला होता ना की, मी एकदिवस डाॅक्टर होऊन दाखवीन…असं उदाहरण देत, त्यांनी मुख्यमंत्र्यांना अप्रत्यक्षरित्या टोला लगावला आहे. त्याच्यासाठी काय मार्कशीटची चोरी करायची ? अरे तु वडिलांना शब्द दिला होता तर, मेहनत कर, परिश्रम कर, कष्ट कर, असे मुनगंटीवार पुढे म्हणाले आणि विधीमंडळात एकच हशा पिकला.
( हेही वाचा: तीन कृषी कायदे पुन्हा येणार? सरकारचे संकेत! )
मंत्र्यांपेक्षा पेंग्विन पाॅवरफुल
मुनगंटीवार यांनी पेंग्विनवरील खर्चाची तुलना राज्यातील मंत्र्यांच्या पगाराशी केली होती. वळसे पाटील साहेब, एवढा पगार तर मंत्री म्हणून तुम्हाला नाही हो. तुमच्यापेक्षा पेंग्विन वरच्या श्रेणीत येतो. कारण मंत्र्याचा पगार २ लाख ५२ हजार किंवा ५३ हजार आहे. पण त्याचा (पेंग्विन) ६ लाख आहे हो. म्हणजे मंत्र्यापेक्षा पेंग्विन पॉवरफुल! १५ कोटी रुपये पेंग्विनवर खर्च होतो. आमची मानसिकता किती भिकारी असावी, असं मुनगंटीवार यावेळी म्हणाले.
Join Our WhatsApp Community