महाराष्ट्रातील ‘या’ दोन बँकांना ‘आरबीआय’चा दणका

136

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एमयूएफजी बँकेवर कर्जाबाबत वैधानिक आणि इतर निर्बंधांबाबत केलेल्या आदेशांचे उल्लंघन केल्याने 30 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. यामध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नियमांचे पालन न केल्याबद्दल महाराष्ट्रातील दोन सहकारी बँकांना सहभाग असून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने त्यांना दंड ठोठावला आहे.

महाराष्ट्रातील या बँकाचा समावेश

महाराष्ट्रातील दोन सहकारी बँकांमध्ये एक बँक रत्नागिरीतील असून दुसरी बँक मुंबईतील सहकारी बँक आहे. चिपळून अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, रत्नागिरी या बँकेने काही कर्जांच्या मर्यादांबाबतच्या नियमांचे पालन केले नाही. त्यामुळे त्यांना दंड ठोठावण्यात आला. त्याशिवाय मुंबईतील दत्तात्रय महाराज कळांबे जाऊळी सहकारी बँक लिमिटेडवरही अशाच प्रकारची कारवाई करण्यात आल्याची माहिती मिळतेय.

(हेही वाचा – “क्रांतीज्योतींच्या भीडेवाड्याचा मेकओव्हर हवाच!”)

अखेर ‘या’ बँकेला 30 लाखांचा दंड

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने असे म्हटले एमयूएफजी बँकेने अशा कंपन्यांना कर्ज दिले , ज्यांच्या संचालक मंडळात इतर बँकांच्या संचालकांचा समावेश होता. आरबीआयच्या निर्देशांचे हे उघडपणे उल्लंघन आहे. दंड ठोठावण्यासाठी हे मुख्य कारण आहे. त्याशिवाय, 11 मार्च 2019 रोजीच्या आर्थिक स्थितीबाबतच्या पर्यवेक्षण मूल्यांकनाच्या दरम्यान, अन्य गोष्टींसह बँकांद्वारे कंपन्यांना कर्ज आणि इतर निर्देशांचे पालन न केल्याचे आरबीआयला आढळले. त्यानंतर आरबीआयने MUFG ला नोटीसही बजावली होती. अखेर या बँकेला 30 लाखांचा दंड ठोठावण्यात आला.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.