भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत यांचे तामिळनाडूच्या कोइम्बतूर आणि सुलूरदरम्यानच्या कुन्नूरमध्ये ८ डिसेंबर रोजी झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात निधन झाले. यांच्या निधनामुळे भारतीयांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. जनरल बिपिन रावत यांच्या निधनानंतर त्यांचे वडिलोपार्जित गाव दत्तक घेण्यासाठी महाराष्ट्रातील एक एनजीओ पुढे सरसावत असल्याचे दिसतेय. ही एनजीओ लातूर मधील असून डॉ. हरिवंशराय बच्चन प्रबोधन प्रतिष्ठानला (HBPP) पौरी गढवाल जिल्हा अधिकाऱ्यांनी सैंज गावात विकास उपक्रम राबविण्याची परवानगी दिली आहे.
विकास उपक्रमांचे होणार नियोजन
डॉ. हरिवंशराय बच्चन प्रबोधन प्रतिष्ठानने दिेलेल्या माहितीनुसार, बिपिन रावत यांच्या वडिलोपार्जित गावात योग्य प्रकारे रस्ते नसल्याने तेथील नागरिकांना अडचणी येत आहेत. डॉ. हरिवंशराय बच्चन प्रबोधन प्रतिष्ठानचे संस्थापक निवृत्ती यादव म्हणाले, की ते पुढील आठवड्यात सैंज गावाला भेट देऊन तिथल्या भूभागाची माहिती घेतील आणि तेथील विकास उपक्रमांचे नियोजन करणार आहे.
(हेही वाचा – राज्यात नाईट कर्फ्यू जाहीर झाल्यानंतर केंद्राने घेतला मोठा निर्णय, वाचा…)
गाव दत्तक घेण्याची प्रक्रिया सुरू
उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी पीटीआयला असे सांगितले की, “डॉ. हरिवंशराय बच्चन प्रबोधन प्रतिष्ठानद्वारे गाव दत्तक घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. स्वयंसेवी संस्थेचे प्रतिनिधी सैंज गावाला भेट देतील आणि तेथे होणार्या विकास उपक्रमांचा आराखडा तयार करतील. ही एनजीओ गावात विकासकामे करण्यास इच्छूक आहे, असे आपण जिल्ह्याधिकाऱ्यांना पत्र लिहून कळवले आहे,”