विधानसभा अध्यक्षांच्या निवडीत राज्यपालांचा हस्तक्षेप?

121

विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडीचा विषय पुन्हा चर्चेला आहे. या अध्यक्ष पदाची निवड गुप्त मतदानाने होणे गरजेचे आहे, पण सरकारने नियमांत बदल करून ही निवड आवजी मताने घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्याला विरोधी पक्ष  भाजपने विरोध केला आहे. या प्रकरणी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या निवडणुकीच्या प्रक्रियेत आता राज्यपालांचा हस्तक्षेप होण्याची शक्यता आहे.

निवडप्रक्रिया संविधानाशी विसंगत 

आता विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा निर्णय राज्यपालच घेतील, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. फडणवीस यांनी अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा निर्णय थेट राज्यपालांच्या कोर्टात टाकल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मीडियाशी बोलताना ही प्रतिक्रिया व्यक्त केली. विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकी संदर्भात राज्यपालांचे जे अधिकार आहेत. त्याबद्दल राज्यपाल निर्णय घेतीलच. मात्र विधानसभा अध्यक्षाच्या निवडणुकीसंदर्भात जे काही बदल केले गेले आहेत ते भारतीय संविधानाला सुसंगत दिसत नाहीत. म्हणून आम्ही आक्षेपही घेतला होता. अशाप्रकारे सर्व अधिकार काढून घ्यायचे आणि लेजिसलेचरमध्ये एक्झिक्यूटिव्हला अधिक महत्व द्यायचे हे योग्य नाही. म्हणून आम्ही त्यास विरोध करतोय, असे फडणवीसांनी सांगितले.

(हेही वाचा आमदार गोपीचंद पडळकरांच्या हत्येचा कट! जयंत पाटलांवर आरोप)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.