थर्टी फस्टच्या सेलिब्रेशनवर परिणाम! आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणांवर ब्रेक!

149

कोरोना विषाणूचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर देशभरात नवे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. ओमायक्रॉनचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, ३१ डिसेंबरच्या सेलिब्रेशनवर सुद्धा निर्बंध असणार आहेत. दरवर्षी लाखो पर्यटक नाताळ व नववर्षाच्या सुट्टीसाठी बाहेरगावी जाणे सोयीचे समजून विविध ठिकाणी सुट्ट्यांचा आनंद घेतात. पण यंदाच्या वर्षीही आंतरराष्ट्रीय प्रवासावर निर्बंध आहेत, तसेच विषाणूच्या वाढत्या प्रमाणामुळे जगभरातील विमान उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.

विमान उड्डाणे रद्द

ओमायक्रॉनच्या वाढत्या प्रमाणामुळे जगभरातील ४ हजार ५०० उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. तर १० हजारांपेक्षा अधिक विमान विलंबाने धावत आहेत. नाताळ सुट्टी व नववर्षाच्या स्वागतासाठी अनेक परदेशी नागरिक प्रवासाला निघाले आहेत. मात्र ओमायक्रॉनमुळे प्रवाशांना अनेक निर्बंधांचा सामना करावा लागत आहे. उड्डाणे रद्द करण्यात आलेल्या कंपन्यांमध्ये लुफ्तान्सा, डेल्टा आणि युनायटेड यांचा समावेश आहे. कर्मचाऱ्यांची कमतरता असल्यामुळेही उड्डाणे रद्द करण्यात आली असल्याचे कंपन्यांकडून सांगण्यात येत आहे. ख्रिसमसच्या दिवशी १ हजार ७७९ उड्डाणे रद्द करण्यात आली होती. तसेच ४०२ फ्लाइट्स रद्द करण्यात आल्या होत्या, ज्या रविवारी टेक ऑफ घेणार होत्या.

( हेही वाचा : तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले, आफिया नाव ठेवले, आणि पुढे ‘असे’ झाले… )

मुंबईतही निर्बंध 

मदत व पुनर्वसन विभागाने एका आदेशान्वये राज्यात २२ डिसेंबर, २०२० ते ५ जानेवारी, २०२१ या कालावधीत रात्री ११.०० ते सकाळी ६.०० वाजेपर्यंत रात्रीची संचारबंदी लागू केली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.