गुलाबी थंडीत नाताळ सण साजरा करण्याचा आनंद लुटल्यानंतर, आता नवीन वर्षाच्या स्वागताचे वेध अनेकांना लागले आहेत. मात्र त्याआधी सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी राज्यात पुन्हा पावसाची हजेरी लागणार असल्याने नवीन वर्षाचे स्वागतही गुलाबी थंडीत होईल की पावसात?, असा प्रश्न निर्माण झाला आहे. हवामान विभागाने राज्यातील विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये 28 आणि 29 डिसेंबर रोजी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, असा इशारा दिला आहे.
पावसाची शक्यता
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 26 डिसेंबरपासून वायव्य भारतावर, तर 27 डिसेंबरपासून मध्य भारतावर वेस्टर्न डिस्टरबन्स अर्थात वाऱ्यांची चक्रीय स्थिती तयार होत असल्याने त्याचा परिणाम वायव्य आणि मध्य भारतावर दिसून येणार आहे. परिणामी 27 ते 29 या कालावधीत या भागांमध्ये पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या स्थितीच्या प्रभावामुळे राज्यातील विदर्भ आणि मराठवाडा भागांतील 14 जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
( हेही वाचा : ‘त्या’ कृषी कायद्यांवर केंद्रीय कृषीमंत्र्याचे केले नवे विधान! जाणून घ्या, कोणते… )
‘या’ भागात यलो अलर्ट
२८ डिसेंबरला औरंगाबाद, जालना, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा व गोंदिया या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर, २९ डिसेंबरला भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या भागात हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. या दरम्यान उर्वरित मध्य महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम सरींचा पाऊस बरसणार आहे.
Join Our WhatsApp Community