औरंगाबादमधील पैठणच्या एकनाथ महाराज मंदिरात १२ कुटुंबीयांचा धर्मातंर सोहळा झाला. यावेळी ५३ जणांनी ख्रिश्चन धर्माचा त्याग करून हिंदू धर्म स्वीकारला आहे. ब्राम्हण सभेच्या पुढाकारानंतर धर्मजागरण विभाग आणि नाथ वंशजांच्या उपस्थितीत हा सोहळा झाला असून पैठणमध्ये वेदशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या पंडितांनी हिंदू धर्म शास्त्रानुसार या सोहळ्याचं पौरोहित्य केलं. या ५३ महिला-पुरुषांनी स्वेच्छेने हिंदू धर्म स्वीकारला असल्याचे सांगितले जात आहे.
आणखी २२ ख्रिस्ती कुटुंब होणार हिंदू
पैठणच्या एकनाथ महाराज मंदिरात जालना जिल्ह्यातील मंठा इथल्या १२ कुटुंबातील ५३ महिला-पुरुषांनी ख्रिश्चन धर्माचा त्याग करून २५ डिसेंबर रोजी हिंदू धर्म स्वीकारला. यावेळी संत एकनाथ महाराज यांचे वंशज यांच्यासह पैठणचे वेदशास्त्र संपन्न ब्रम्हवृंदांची उपस्थिती होती. मंठा तालुक्यातील आणखी २२ ख्रिस्ती कुटुंबातील जवळपास ६५ महिला पुरुष ख्रिश्चन धर्माचा त्याग करण्याची ईच्छा व्यक्त केली आहे. ५ जानेवारी रोजी धार्मिक मुहुर्तावर पैठण येथील नाथमंदिरातच या धर्मांतर विधीचे आयोजन करण्यात आले असल्याचे देखील सांगितले जात आहे.
(हेही वाचा –मुंबई उच्च न्यायालय म्हणतं, ‘महिलेच्या पायांना स्पर्श करणं म्हणजे विनयभंगच’)
ब्राह्मण सभेच्या वतीने पुढाकाराने विधीवत धर्मवापसी
जालना जिल्ह्यातील मंठा येथील १२ कुटुंबातील ५३ ख्रिश्चन महिला पुरुषांनी पुन्हा हिंदू धर्मात येण्याची ईच्छा व्यक्त केली होती. ख्रिश्चन धर्माचा त्याग करून हिंदू धर्मवापसी करता येईल का ? अशी विचारणा त्यांच्याकडून करण्यात आल्यानंतर पैठणच्या ब्राह्मण सभेच्या वतीने पुढाकार घेण्यात आला. स्वेच्छेने धर्मांतर करायचे असल्याने धार्मिक विधी करण्याचे नियोजन करण्यात आले. त्यानुसार नाथमंदिरात शांतीब्रम्ह नाथमहाराजांच्या समाधीसमोर विधीवत धर्मवापसी सोहळा झाला.
Join Our WhatsApp Community