चंद्रपूरातील राजूरा येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या उद्घाटन करताना राज्याचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी पुतळ्यावरच पाय ठेऊन पुष्पहार वाहिल्याचा आरोप भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केला होता. यावेळी महाविकास आघाडीच्या मंत्र्यांनी शिवाजी महाराजांचा अपमान केल्याचा आरोप भाजपच्या नेत्यांनी केला आहे. भाजपचे नेते केशव उपाध्ये यांनी यासंदर्भातला व्हिडिओ ट्विट केला आहे. या आरोपाला विजय वडेट्टीवार यांनी चोख प्रत्युत्तर देत उपाध्येना खुलं आवाहन दिलं आहे. केशव उपाध्ये यांनी डोळे उघडावेत, उगाच अंधभक्तासारखे आरोप करु नयेत. या व्हिडिओ मी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावर पाय ठेवल्याचे केशव उपाध्ये यांनी सिद्ध करुन दाखवावे, असे जाहीर आव्हान वडेट्टीवार यांनी दिले.
असे केले उपाध्येंनी ट्विट
महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री विजय वडेट्टीवार यांनी शिवाजी महाराजांचा अपमान केल्याचा आरोप भाजपच्या नेत्यांनी केला आहे. भाजपचे नेते केशव उपाध्ये यांनी यासंदर्भातला व्हिडिओ ट्विट केला आहे. तसेच आता शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या महाविकास आघाडीच्या मंत्र्यांवर उद्धव ठाकरे काय अॅक्शन घेणार, असा सवाल त्यांनी ट्विटच्या माध्यमातून केला आहे.
(हेही वाचा- मुंबई उच्च न्यायालय म्हणतं, ‘महिलेच्या पायांना स्पर्श करणं म्हणजे विनयभंगच’)
महाआघाडी सरकारमधील मंत्री @VijayWadettiwar यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान. चंद्रपुर राजूरा येथे पुतळ्यावर हार घालण्यासाठी पुतळ्याचा भागावरच पाय ठेवला…@OfficeofUT काय ॲक्शन घेणार वडेवट्टीवारांवर की सत्तेसाठी दुर्लक्ष करणार? pic.twitter.com/Ire1qbJ798
— Keshav Upadhye (@keshavupadhye) December 27, 2021
उपाध्येना वडेट्टीवाराचं जाहीर आव्हान
केशव उपाध्येंनी डोळे उघडून अंध भक्तासारखे बघू नये. मी शिवरायांच्या पुतळ्याला हार घालताना महाराजांच्या शेजारी माझा पाय आहे. पायावर पाय नाही. जरा अंधभक्त बनू नका. अंधळेपणाने बोलू नका. मी चॅलेंज करतो उपाध्येला. तो व्हिडिओ माझ्याकडे आहे. संपूर्ण क्लिप आहे. आपणही बारकाईने पाहिला तर दिसेल. पायाशेजारी माझा पाय आहे, असा दावा यावेळी विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
वडेट्टीवारांचा भाजपला टोला
पुढे वडेट्टीवार असेही म्हणाले, भाजपची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयात ५० वर्षात शिवरायांचा फोटो लावण्यात आला नाही. त्यांनी आम्हाला शिवरायांसदर्भात शिकवू नये, असा टोला विजय वडेट्टीवार यांनी भाजपला लागवा. तसेच माझी हाइट कमी आहे. मात्र, भाजपकडून हा मुद्दामहून खोडसाळपणा सुरू असल्याचे दिसतेय. भारतीय जनता पक्षाचे काही विद्रुप लोक, काही द्वेष्टे लोक मुद्दाहून छत्रपती शिवरायांच्या संदर्भात माझे नाव जोडून बदनामी करण्याचे काम करत आहे. मी स्पष्टपणे सांगतो त्यांच्यामध्ये जर दम असेल, तर व्हिडिओ घेऊन या, आणि हा आरोप सिद्ध करून दाखवा.
Join Our WhatsApp Community