‘ठाकरे सरकार’चं ‘वांद्रे वंडरलॅंड’ करतंय लोकांच्या जीवाशी खेळ!

111

गेल्या २ ते ३ वर्षांपासून नाताळ आणि नवीन वर्षाचे औचित्य साधून वांद्रे रेक्लेमेशन येथे वांद्रे वंडरलॅंड कार्यक्रमाचे आयोजन करत नाविन्यपूर्ण लाईटिंंग केली जाते. अनेक लोक ही लाईटिंग पाहण्यासाठी येत असतात. यंदाही महाराष्ट्राचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी ही रोषणाई पाहण्यासाठी जरूर या, असे ट्विट करत आमंत्रित केले आहे. ही भव्य रोषणाई एमएसआरडीसी (MSRDC) आणि जिओ (JIO) यांच्या मदतीने सरकारने केली आहे.

वांद्रे वंडरलॅंडच्या रोषणाईचे आकर्षण म्हणून रोज हजारो पर्यटक याठिकाणी गर्दी करत आहेत. त्यामुळे वांद्रे वंडरलॅंड कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला आमंत्रण तर देत नाही ना, असे सवाल उपस्थित केले जात आहेत. दरम्यान ही रोषणाई पाहण्यासाठीचे प्रवेशद्वार एका बाजूनेचं खुले ठेवण्यात आले आहे. त्यामुळे लाईटिंग पाहण्यासाठी पर्यटकांनी दुसऱ्या निमूळत्या, तुटलेल्या मार्गचा अवलंब केला आहे. यामध्ये एका मुलीला इजाही झालेली आहे. अशीच गर्दी वाढत राहिली तर ३१ डिसेंबरच्या रात्री काय परिस्थिती निर्माण होईल, असाही सवाल अनेकांनी उपस्थित केला आहे.

करोडोंची रोषणाई अन् नियोजनाचे तीनतेरा

रेक्लेमेशन येथील भव्य रोषणाई पाहण्यासाठी एकाच प्रवेशद्वारातून प्रवेश दिला जात आहे. ते प्रवेशद्वारही अर्धेच खुले ठेवण्यात आले आहे. यामुळे मुख्य प्रवेशद्वाराजवळचं नागरिकांची मोठ्या प्रमाणाच गर्दी होत होत आहे. परिणामी चेंगराचेंगरी होण्याची भिती वर्तवली जात आहे. तसेच ३१ डिसेंबरपूर्वी या गर्दीचे कसे नियोजन करणार याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

दरम्यान, याठिकाणी एकच मुख्य प्रवेशद्वार असल्यामुळे नागरिक आपल्या सोयीसाठी दुसऱ्या निमूळत्या, तुटलेल्या मार्गाचा अवलंब केला आहे. अनेक लहान मुले आणि वरिष्ठ नागरिक तुटलेल्या गेटच्या फॉलिंगमध्ये अडकले आहेत. तसेच एका मुलीला यामुळे डोळ्याला दुखापत झालेली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

जबाबदार कोण ?

Aaditya 3आदित्य ठाकरे यांनी सर्व नागरिकांना आमंत्रित करून रेक्लेमेशनला भेट देण्याचे आवाहन केले आहे. तसेच आयोजन कर्ता राहूल कनाल, पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी या वांद्रे वंडरलॅंड स्थळाला भेट देऊन नियोजनाची पाहणी केली होती. तरीही अशी परिस्थिती का निर्माण झाली. असा सवाल उपस्थित केला जात आहे.

nangare patil

( हेही वाचा : पैठणमध्ये ५३ ख्रिश्चन बांधवांचा धर्म त्याग, स्वीकारला हिंदू धर्म! )

कोविडच्या नियमांचे पालनही केले जात नसून सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला आहे. त्यामुळे ठाकरे सरकार कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला आमंत्रित करतंय अशी चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.