बडतर्फ एसटी कर्मचाऱ्यांवरील कारवाई मागे घेणार नाही, अशी माहिती विधानसभेत राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावरील चर्चेत राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांनी एसटीच्या बडतर्फ कर्मचाऱ्यांवरील कारवाई मागे घेऊन त्यांना कामावर परत घेणार का? असे विचारले असता, त्यावर अनिल परब यांनी असे सांगितले की, ज्या एसटी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती, मात्र ते पुन्हा कामावर रूजू झाले, त्यांच्यावरील निलंबनाची कारवाई मागे घेण्यात आली मात्र बडतर्फ कर्मचाऱ्यांवरील कारवाई मागे घेण्यात येणार नसल्याचे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.
(हेही वाचा – आग्र्यात RSS कार्यालयावर हल्ला करणाऱ्यांना होणार कठोर कारवाई!)
कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका
राज्य सरकारने 14 टक्के पगारवाढ केल्यानंतर वेतन वेळेवर मिळणार नाही अशा अफवा पसरवल्या जात आहेत. पंरतु राज्य सरकारने कर्मचाऱ्यांच्या पगाराची हमी घेतली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना वेतन महिन्याच्या १० तारखेपर्यंत करण्यात येणार आहे. कर्मचाऱ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये वाढ झाली आहे. कर्मचारी रुजू झालेत त्यांना वेतन मिळाले आहेत. फक्त अफवांचा बाजार उठवून आंदोलन केले जात आहे. त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नका, असे अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांना अवहान केले आहे.
एका व्यक्तीला सेवेमध्ये समाविष्ठ करणार
यासह कोरोना दरम्यान, ज्या एसटी कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. तसेच काही कर्मचाऱ्यांचा कौटुंबिक कारणामुळे, पगार वेळेत न मिळाल्यामुळे, कोरोनामुळे, आर्थिक कारणामुळे कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली आहे. यापैकी एसटीच्या निकषानुसार ज्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे, त्याच्या कुटुंबातील एका व्यक्तिला अनुकंपा तत्वावर सेवेमध्ये समाविष्ठ करून घेण्यात येणार आहे, असेही अनिल परब यांनी विधानसभेत बोलताना सांगितले.
Join Our WhatsApp Community