सोलापूरात एकाच दिवशी रोखले दोन बालविवाह!

107

सोलापूर जिल्ह्यातील आजोती व तिसंगी या दोन गावांत होणारे अल्पवयीन मुलींचे विवाह तालुका आणि ग्रामीण पोलिसांनी रोखले आहेत. भारतात कायद्याने बालविवाह करण्यास मान्यता नाही. तरीही आजही कित्येक भागात मुलींचे लहान वयात लग्न लावले जाते. महाराष्ट्रात एकाच दिवशी बालविवाहाच्या दोन घटना घडल्या आहेत.

बालविवाह रोखले 

कण्हेरगाव तालुका माढा येथील एका १३ वर्षीय मुलीचा आजोती येथील युवकाशी तर, अकलूज (ता. माळशिरस) येथील १५ वर्षीय मुलीचा बालविवाह मस्के वस्ती, तिसंगी येथील युवकाशी होणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक मिलिंद पाटील, अंमलदार परशुराम शिंदे यांनी आजोती येथे जाऊन बालविवाह थांबवला.

( हेही वाचा : कौतुकास्पद! बायो एलएनजी स्टेशनसाठी गडकरींचा पुढाकार )

पालकांचे समुपदेशन

बालविवाह रोखण्यासाठी सर्वप्रथम मुलीच्या पालकांचे समुपदेशन करणे महत्वाचे असते. जर पालक आणि समाजातील सदस्य सुशिक्षित असतील तर त्यांना त्यांचे विचार बदलण्यासाठी, मुलींच्या हक्कांसाठी बोलण्यासाठी प्रोत्साहित केले जाऊ शकते. म्हणूनच आजोती येथील विवाह रोखल्यानंतर या मुलीच्या पालकांचे समुपदेशन करण्यात आले. त्या मुलीस सोलापूर येथील महिला व बालकल्याण समितीसमोर हजर केले. तसेच पोलिस निरीक्षक धनंजय जाधव, पोलिस उपनिरीक्षक केदार यांनी तिसंगी येथे जाऊन होणारा बालविवाह रोखला. यातील मुलीलाही महिला व बालकल्याण समितीसमोर हजर केले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.