कोंडिविटांत उभारणार नवीन जलतरण तलाव

132

मुंबई महापालिकेच्यावतीने आणखी एक जलतरण तलाव उभारले जाणार आहे. अंधेरी कोंडिवटा येथे हे जलतरण तलाव उभारले जात असून दहिसरच्या धर्तीवरच हे जलतरण असणार आहे. यासाठी आठ कोटी ७४ लाख रुपये खर्च केले जाणार आहे. अंधेरी कोंडिविटा गाव येथे महापालिकेच्यावतीने प्रोटोटाईप जलतरण तलाव अर्थात आरसीसी बांधकाम केले जाणार आहे. यासाठी मागवलेल्या निविदांमधून पात्र कंत्राटदाराची निवड करण्यात आली आहे. यामध्ये कंत्राटदाराने अंदाजित रकमेपेक्षा २० टक्के कमीची बोली लावून काम मिळवण्याचा प्रयत्न केला. यामध्ये कनक कन्स्ट्रक्शन ही कंपनी पात्र ठरली आहे.

पाच ठिकाणी जलतरण तलावाचे काम सुरु

या कामांमध्ये आरसीसी कामांसह संतुलन टाकी, फिल्ट्रेशन प्लांट, प्रशासकीय इमारतीचे बांधकाम, चेंजिंग रुम्स, लॉकर रुम्स, संरक्षण भिंत, प्रवेशद्वार आणि सभोवतालच्या परिसरातच सुशोभिकरण, विद्युत कामे आणि हिरवळीचे काम करण्यात येणार आहे. मुंबई महापालिकेच्यावतीने शिवाजी पार्क, अंधेरी, मुलुंड, चेंबूर आदींसह दहिसरमध्ये जलतरण तलाव सुरु आहेत, तर पाच ठिकाणी जलतरण तलावाचे काम सुरु आहे. त्यामुळे कोंडिविटाच्या माध्यमातून आणखी एका ठिकाणी जलतरण तलाव बनवले जात आहे.

(हेही वाचा ओमायक्रॉनमुळे सिद्धिविनायक मंदिरही सतर्क! दर्शन नियमात बदल होण्याची शक्यता)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.