मुंबईत आणखी ४५० कोटींची रस्त्यांची कामे!

104

मुंबईतील रस्ते विकास कामांच्या ४१ प्रस्तावांना मंजुरी देण्यात आल्यानंतर उर्वरीत रस्त्यांच्या कामांचे दहा प्रस्ताव स्थायी समितीच्या पटलावर रस्ते विभागाने मंजुरीसाठी ठेवले आहे. यापूर्वी १३०० कोटींहून अधिक रकमेचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले होते. आता अजून सुमारे ४५० कोटी रुपयांचे प्रस्ताव असून या प्रस्तावांना मंजुरी दिल्यानंतर या कामांना सुरुवात केली जाणार आहे.

भाजपचा सभात्याग

मुंबईतील बहुचर्चित रस्त्यांच्या कामांच्या निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यांनतर आता त्यातील प्रस्ताव स्थायी समितीच्या पटलावर ठेवण्यात येत आहे. मागील स्थायी समितीच्या बैठकीत १३०० कोटी रुपयांचे ४१ प्रस्ताव मंजुरीसाठी पटलावर ठेवल्यानंतर भाजपने यापूर्वी  १७ मार्च २०२० मध्ये जे रस्त्यांचे प्रस्ताव मंजूर केले होते, त्या कामांचा प्रगती अहवाल समितीपुढे पटलावर ठेवला जावा आणि तोवर हे प्रस्ताव पुढील बैठकीपर्यंत राखून ठेवले जावे, अशी मागणी केली होती. परंतु सत्ताधारी पक्षाने भाजपची ही मागणी उडवून लावत प्रशासनाची पाठराखण करत हे सर्व प्रस्ताव मंजूर केले होते. यावेळी सत्ताधारी पक्षाने, भाजपवर रस्त्यांची कामे अडवून शिवसेनेला बदनाम करण्याचा डाव असल्याचा आरोप केला होता. त्यामुळे भाजपने याचा निषेध व्यक्त करत सभात्याग केला.

( हेही वाचा : ‘त्या’ दंगली सुनियोजित! रझा अकादमीवर शासन कारवाई करणार का? )

रस्त्यांच्या कामांचे प्रस्ताव सादर

पण आता रस्ते विभागाने उर्वरीत रस्त्यांच्या कामांचे प्रस्ताव सादर केले. तब्बल साडेचारशे कोटींचे दहा प्रस्ताव असून यामध्ये  शहर भागातील कुलाबा ते भायखळापर्यंतच्या विविध रस्त्यांच्या पदपथांचे मजबुतीकरणासह जी उत्तर विभाग, एफ दक्षिण, एच पश्चिम,  पी दक्षिण, पी दक्षिण, के पूर्व व एस विभाग,  के पश्चिम विभाग एच पूर्व, पी उत्तर आदी विभागांमधील विविध रस्त्यांचे सिमेंटीकरण तसेच म्हाडा वसाहतीतील विविध रस्त्यांचे सिमेंटीकरण व पॅसेजचे सिमेंटीकरण करण्याच्या कामांचा हा प्रस्ताव आहे. तसेच आर दक्षिण विभागातील ६ मीटर रुंदी पेक्षा कमी रस्त्यांचे सिमेंट काँक्रीट व पॅसेजेसचे सिमेंटीकरण आदी कामांचा समावेश आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.