देशातील पाच राज्यात विधानसभा निवडणूक होणार, पण…

आयोगाने दिले लसीकरण वाढवण्याचे निर्देश

137

देशातील गोवा, मणिपूर, उत्तराखंड, पंजाब आणि उत्तरप्रदेश या पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. पण, या सर्व राज्यात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाचा वेग वाढवला जावा असे निर्देश निवडणूक आयोगाने केंद्र सरकारला दिले आहेत. त्यामुळे या राज्यांमधील निवडणुका पुढे ढकलण्याचा आयोगाचा मनास नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.

2022 च्या पहिल्या तिमाहीत निवडणूर होणार

निवडणूक आयोगाच्या आज, सोमवारी झालेल्या बैठकीत केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी निवडणूक आयोगाला मतदान होणार असणाऱ्या प्रत्येक राज्यातील लसीकरणाबाबतची माहिती दिली. दरम्यान, पाच राज्यांत होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुका पुढे ढकलल्या जाण्याची शक्यता नसल्याचे निवडणूक आयोगातील सूत्रांनी सांगितले. तसेच 2022 च्या पहिल्या तिमाहीत 5 राज्यांमध्ये निवडणूक होणार आहे.

(हेही वाचा – धक्कादायक! महाराष्ट्रात सापडले घबाड, ३१ ठिकाणी आयकर विभागाचे छापे)

निवडणुकांसह रॅली आयोजित करण्याबाबत चिंता

कोरोना रूग्णांच्या संख्येत झालेली वाढ आणि ओमिक्रॉनमुळे निर्माण झालेल्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर, पाच राज्यांमध्ये निवडणुका आणि रॅली आयोजित करण्याबाबत चिंता व्यक्त करण्यात आली आहे. ज्या राज्यांमध्ये लसीकरणाचे प्रमाण कमी आहे, तेथे निवडणूक आयोगाने आरोग्य मंत्रालयाला लसीकरण प्रक्रिया जलद करण्यास सांगितले आहे, जेणेकरून अधिकाधिक लोकसंख्येचे लवकरात लवकर लसीकरण केले जाईल. उत्तराखंड आणि गोव्यात पहिल्या डोस घेणाऱ्याची संख्या शंभर टक्क्यांच्या जवळपास आहे, तर उत्तर प्रदेशमध्ये ते 85 टक्के आणि मणिपूर आणि पंजाबमध्ये सुमारे 80 टक्के आहे.

आढावा घेतल्यानंतर योग्य तो निर्णय होणार

अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने सरकार आणि निवडणूक आयोगाला विधानसभेच्या निवडणुका एक किंवा दोन महिन्यांनी पुढे ढकलण्याचा आणि देशातील कोविड परिस्थितीमुळे सर्व राजकीय रॅलींवर बंदी घालण्याचा विचार करण्याची विनंती केली होती. याबाबत मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्र यांना विचारले असता, आयोग लवकरच उत्तर प्रदेशचा दौरा करणार असून, परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर योग्य तो निर्णय घेतला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.