‘किशोरवयीन’ मुलांना मिळणार लस, अशी करा ‘कोविन’ अॅपवर नोंदणी

132

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ ते १८ वयोगटातील किशोरवयीन मुलांच्या लसीकरणाची घोषणा 25 डिसेंबर (शनिवारी) केली. या किशोरवयीन मुलांच्या लसीकरणाचा प्रारंभ ३ जानेवारीपासून होईल, असे पंतप्रधानांनी नमूद केले. किशोरवयीन मुलांनी कोविन अॅपवर नोंदणी कशी करायची ते जाणून घेऊया.

कशी कराल लसीकरणासाठी नोंदणी?

  •  cowin.gov.in संकेतस्थळावर जा आणि तुमचा मोबाईल क्रमांक टाका.
  • मोबाईलवर आलेला ओटीपी दिलेल्या जागेत भरून Verify वर क्लिक करा.
  • ओटीपी व्हॅलिडेट झाल्यावर व्हॅक्सिनसाठीच्या नोंदणीचं पेज उघडेल. इथे तुमची माहिती भरा आणि Register वर क्लिक करा.
  • तुम्हाला मोबाईलवर नोंदणी यशस्वी झाल्याचा मेसेज येईल. नोंदणी झाल्यावर तुम्हाला अकाऊंट डिटेल्स दाखवले जातील. या पेजवर तुम्ही लसीकरणासाठीची अपॉइंटमेंट निवडू शकता.
  • एका मोबाईल क्रमांकावर एकूण ४ लोकांची लसीकरणासाठी नोंदणी करण्याची परवानगी असेल. यासाठी नोंदणी करताना सर्व सदस्यांची माहिती भरणं आवश्यक असेल.
  • आरोग्य सेतू मोबाईल अ‍ॅपच्या माध्यमातून देखील तुम्हाला नोंदणी करता येऊ शकेल. यासाठी अ‍ॅपवर स्वतंत्र लिंक देण्यात आली असून तिथे नोंदणीसाठी तुम्हाला तुमचं नाव, वय, लिंग अशी माहिती भरून नोंदणी करता येऊ शकेल.

 ( हेही वाचा :‘या’ कारणांमुळे रखडले छत्रपती शिवाजी महाराजांचे आंतरराष्ट्रीय स्मारक! )

बूस्टर डोस दिला जाणार

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.