लद्दाखच्या कारगिल परिसरात सोमवारी संध्याकाळी 7 वाजता भूकंपाचे तीव्र धक्के जाणवलेत. या भूकंपाची तीव्रता 5 रिश्टर इतकी नोंदवण्यात आली. या भूकंपाचे केंद्र गिलगीट बलुचिस्तानमध्ये 10 किलोमीटर खोल होते.
गिलगीट बलुचिस्तान भूकंपाचे केंद्र
मिळालेल्या माहितीनुसार, कारगिल परीसरात संध्याकाळी 7 वाजता भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. या भूकंपानंतर स्थानिक लोक घाबरून घराबाहेर पडले होते. या भूकंपाचे केंद्र गिलगीट बलुचिस्तानमध्ये 10 किलोमीटर जमिनीखाली असल्याची माहिती आहे. यासोबतच हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्यात देखील सोमवारी, सकाळी भूकंपाचे धक्के जाणवलेत.
(हेही वाचा – धक्कादायक! महाराष्ट्रात सापडले घबाड, ३१ ठिकाणी आयकर विभागाचे छापे)
मागील 7 दिवसांत दुसऱ्यांदा भूकंपाचे धक्के
या ठिकाणी रविवारी 26 डिसेंबर रोजी देखील भूकंपाचे धक्के जाणवले होते. मंडी जिल्ह्यातही सकाळी आलेल्या भूकंपाची तीव्रता मागील धक्क्यांपेक्षा जास्त होती. या भागात मागील 7 दिवसांमध्ये दुसऱ्यांदा 3 रिश्टर स्केलपेक्षा जास्त क्षमतेचा धक्का जाणवला होता. यासोबतच गेल्या 22 डिसेंबर रोजी देशातील काही भागात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले होते. कर्नाटकातील बेंगळुरूजवळील चिक्कबल्लापूर जिल्ह्यात सकाळी सलग दोन दिवस भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. सकाळी 7 वाजून 10 मिनिटांनी आणि 7 वाजून 15 मिनिटांच्या सुमारास झालेल्या भूकंपाचा केंद्रबिंदू मांडिकल आणि भोगपर्थी गावांजवळ होता. त्यांची तीव्रता रिश्टर स्केलवर 2.9 आणि 3 इतकी मोजली गेली.
Join Our WhatsApp Community