ब्रिटनच्या राणीला मारण्याचा कट! कोण आहे ‘तो’ भारतीय?

126

ब्रिटनची राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या हत्येचा डाव आखून विंडसर कॅसल पॅलेसमध्ये घुसलेल्या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. 1919 च्या जालियनवाला बाग हत्याकांडाचा बदला घेण्यासाठी या तरुणाला राणीला मारायचे होते. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये, चेहरा पूर्णपणे झाकलेल्या एका तरुणाने जालियनवाला बाग हत्याकांडाचा बदला घेण्यासाठी ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ II च्या हत्येची घोषणा केली. भारतीय शीख असल्याचा दावा करणाऱ्या या तरुणाला राणीच्या विंडसर कॅसल पॅलेसमधून अटक करण्यात आली आहे.

राजवाड्यात पत्नीसह प्रिन्स चार्ल्स

प्रिन्स चार्ल्स आणि त्यांची पत्नी कॅमिला देखील सध्या विंडसर कॅसलमध्ये ख्रिसमसच्या सुट्ट्या घालवत आहेत. सध्या स्कॉटलंड यार्डने या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.

पोलीस तपास सुरु

आरोपीने जसवंत सिंग छैल असे आपले नाव सांगितले आहे. दरम्यान, मेट्रोपॉलिटन पोलिसांनी नाव न सांगता सांगितले की, १९ वर्षीय तरुणाला अटक करून मानसिक रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. अटक केलेल्या संशयिताचे मूल्यांकन केल्यानंतर, यूके मानसिक आरोग्य कायद्यांतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस त्याच्या साउथॅम्प्टन घराची चौकशी करत आहेत, जिथे तो त्याच्या कुटुंबासह राहतो. स्कॉटलंड यार्डचे अधिकारी ख्रिसमसच्या दिवशी क्रॉसबोसह अटक केलेल्या व्यक्तीच्या विंडसर कॅसलमधील व्हिडिओची तपासणी करत आहेत.

 ( हेही वाचा: ओमायक्रॉनमुळे सिद्धिविनायक मंदिरही सतर्क! दर्शन नियमात बदल होण्याची शक्यता )

तरुण म्हणाला होता- माझा मृत्यू जवळ आला!

अटकेच्या २४ मिनिटे आधी आरोपीने स्नॅपचॅटवर व्हिडिओ अपलोड केल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. ‘स्टार वॉर्स’ चित्रपटातील व्यक्तिरेखेसारखा मुखवटा आणि हुड जॅकेट परिधान केलेल्या आरोपीने व्हिडिओ संदेशात म्हटले आहे की, मी भारतीय शीख आहे. माझे नाव जसवंत सिंग चाईल आहे. ..माझा मृत्यू जवळ आला आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ सापडला तर कृपया स्वारस्य असलेल्या लोकांपर्यंत शेअर करा.. मी जे केले आणि जे करणार आहे त्याबद्दल क्षमस्व. मी राणी एलिझाबेथची हत्या करण्याचा प्रयत्न करेन. जालियनवाला बाग हत्याकांडाचा हा सूड असेल, जिथे लोकांना जातीय आधारावर मारले गेले आणि अपमानित केले गेले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.