भारत आज जगातील दुसरे सर्वात मोठे स्टार्ट-अप हब म्हणून उदयास आले आहे. देश आत्मनिर्भर झाल्यानंतर आपण कोणावरही अवलंबून राहणार नाही. तरुणांनी देशाला आत्मनिर्भर बनवण्यासाठी अधीर बनावे. आत्मनिर्भरता हेच स्वातंत्र्याचे मूळ रूप असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. ते आज, मंगळवारी आयआयटी कानपूरच्या दीक्षांत समारंभाला संबोधित करताना बोलत होते.
आरामाऐवजी आव्हानांची निवड करा
देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत आहेत, तोपर्यंत आपणही स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी खूप काही करायला हवे होते. तेव्हापासून खूप उशीर झाला आहे, देशाचा बराच वेळ वाया गेला आहे. मध्ये दोन पिढ्या गेल्या, त्यामुळे दोन क्षणही गमावायचे नसल्याचे पंतप्रधान म्हणाले.
स्वातंत्र्याच्या या अमृत महोत्सवी वर्षात आमच्याकडे 75 हून अधिक युनिकॉर्न, 50 हजारांहून अधिक स्टार्ट-अप आहेत. त्यापैकी 10 हजार गेल्या 6 महिन्यांतच आले आहेत. भारतीय कंपन्या जागतिक व्हाव्यात, भारताची उत्पादने जागतिक व्हावीत, असे कोणाला वाटत नसल्याचे त्यांनी सांगितले. प्रवासात अनेक लोक तुम्हाला सोयीसाठी शॉर्टकट सांगतील. पण माझा सल्ला असा आहे की, तुम्ही आरामाऐवजी आव्हानांची निवड करावी. कारण आव्हाने कुणालाही टाळता येत नसून त्यापासून दूर पळणारे त्यांचे बळी ठरतात, असे पंतप्रधान म्हणाले.
( हेही वाचा : “कोण अजित पवार? मी नाही ओळखत”, नारायण राणेंचा हल्लाबोल )
तंत्रज्ञानाशिवाय जीवन अपूर्ण
सध्याचे हे युग, पूर्णपणे तंत्रज्ञानावर आधारित आहे. या दशकातही तंत्रज्ञान विविध क्षेत्रात आपला दबदबा वाढवणार आहे. तंत्रज्ञानाशिवाय जीवन आता एक प्रकारे अपूर्णच आहे. हे जीवन आणि तंत्रज्ञानाच्या स्पर्धेचे युग आहे आणि मला खात्री आहे की, तुम्ही यात नक्कीच पुढे याल. 1930 चा तो काळ, 20-25 वर्षांची तरुणाई, 1947 पर्यंतचा त्यांचा प्रवास आणि 1947 मधील स्वातंत्र्यप्राप्ती हा त्यांच्या आयुष्यातील सुवर्णकाळ होता, असे ते म्हणाले. आज तुम्हीही अशाच प्रकारे सुवर्ण युगात पाऊल टाकत आहात. हे जसे राष्ट्रजीवनाचे अमृत आहे, तसेच ते तुमच्या जीवनाचे अमृत असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.
Join Our WhatsApp Community