कोविड रुग्ण वाढीचा स्फोट…इतकी झाली रुग्ण संख्या

125

मागील आठ ते दहा दिवसांपासून कोविड रुग्णांच्या वाढत्या रुग्ण संख्येमुळे मुंबईकरांच्या उरात धडकी भरलेली असतानाच मंगळवारी या रुग्ण संख्येचा स्फोट झाला आहे. मंगळवारी दिवसभरात १,३७७ रुग्ण आढळून आले आहेत. मागील २३ डिसेंबरच्या रुग्ण संख्येत दुप्पट आकडा अवघ्या सहा दिवसांमध्येच गाठला गेला आहे. त्यामुळे वाढती रुग्ण संख्या ही मुंबईच्या चिंतेत भर पाडणारी ठरणार आहे. त्यामुळे मुंबईकरांनी कोविड नियमावलीचे पालन करत सार्वजनिक आणि गर्दीच्या ठिकाणी सोशल डिस्टन्स राखत, मास्कचा वापर कायम करावा, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

रुग्ण दुपटीचा दर हा ८४१ दिवसांवर

सोमवारी दिवसभरात जिथे ४३ हजार ३८३ चाचणी केल्यानंतर ८०९ बाधित रुग्ण आढळून आले होते, तिथे बुधवारी ३२ हजार ३६९ चाचणी केल्यानंतर १,३७७ बाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर ३३८ रुग्ण बरे होऊन घरी परतले. तर विविध रुग्णालयांमध्ये व कोविड सेंटरमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या ५ हजार ८०३ एवढी झाली आहे. तर मृत्यू पावलेल्या रुग्णांची एक आहे. मृत्यूचा आकडा कमी झाला असला तरी दोन हजारांवर पोहोचलेला रुग्ण दुपटीचा दर हा ८४१ दिवस एवढा आहे. मुंबईत सक्रिय कंटेन्मेंट झोन असलेल्या झोपडपट्टी व चाळीची संख्या एक असली तरी इमारती व सीलबंद इमारतींच्या संख्येतही वाढ होत ३७ पर्यंत पोहोचली आहे.

(हेही वाचा नितेश राणेंचा ‘फैसला’ उद्यावर! न्यायालयात कुणी कसा केला युक्तीवाद?)

मागील बारा दिवसांमधील बाधित रुग्णांची आकडेवारी

  • २८ डिसेंबर २१ : चाचण्या -३२,३६९, बाधित रुग्ण – १३७७, मृत्यू -१, बरे झालेले रुग्ण -३३८
  • २७ डिसेंबर २१ : चाचण्या -४३,३८३, बाधित रुग्ण – ८०९, मृत्यू -३, बरे झालेले रुग्ण -३३५
  • २६ डिसेंबर २१ : चाचण्या -३४,८१९, बाधित रुग्ण – ९२२, मृत्यू -२, बरे झालेले रुग्ण -३२६
  • २५डिसेंबर २१ : चाचण्या -४२,४२७ बाधित रुग्ण – ७५७, मृत्यू -०, बरे झालेले रुग्ण -२८०
  • २४ डिसेंबर २१ : चाचण्या -४०,४७२, बाधित रुग्ण – ६८३, मृत्यू -१, बरे झालेले रुग्ण -२६७
  • २३ डिसेंबर २१ : चाचण्या -३९,४२३, बाधित रुग्ण – ६०३, मृत्यू -१, बरे झालेले रुग्ण -२०७
  • २२ डिसेंबर २१ : चाचण्या -४५,०१४, बाधित रुग्ण – ४०९, मृत्यू -०, बरे झालेले रुग्ण -२२९
  • २१ डिसेंबर २१ : चाचण्या – ३७,९७३, बाधित रुग्ण – ३२७, मृत्यू -१, बरे झालेले रुग्ण -२२७
  • २० डिसेंबर २१ : चाचण्या -३०,६७२, बाधित रुग्ण – २०४, मृत्यू -०, बरे झालेले रुग्ण -२२९
  • १९ डिसेंबर २१ : चाचण्या -४०,८५७, बाधित रुग्ण – ३३६, मृत्यू -२, बरे झालेले रुग्ण -२०१
  • १८डिसेंबर २१ : चाचण्या -५१,१७१, बाधित रुग्ण – २८३, मृत्यू -०, बरे झालेले रुग्ण -२७५
  • १७ डिसेंबर २१ : चाचण्या -५१,२६६ बाधित रुग्ण – २९५, मृत्यू -१, बरे झालेले रुग्ण -२२७
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.