धक्कादायक! सैन्यांच्या जमिनीवरही अतिक्रमण

136

भारतीय सैन्याच्या देशभरातील 9 हजार 505 एकर जमिनीवर अनाधिकृतपणे कब्जा करण्यात आला आहे. केंद्रीय संरक्षण विभागाच्या अहवालात याबाबत खुलासा करण्यात आला आहे. संसदेत एका प्रश्नावरील उत्तर म्हणून हा खुलासा मांडण्यात आला आहे. या अहवालात देशभरातील सैन्य जमिनीवरील अतिक्रमणांचा तपशील देण्यात आला आहे.

भू-माफियांच्या ताब्यात जमिनी

संरक्षण मंत्रालयाच्या अहवालात देशातील 30 राज्यांत आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये सैन्याच्या जमिनींवर झालेल्या अतिक्रमणाची माहिती देण्यात आली आहे. विशेष म्हणजे लष्कराच्या अतिक्रमण झालेल्या सध्याच्या 9 हजार 505 एकर जमिनींपैकी निम्म्याहून अधिक म्हणजेच 4 हजार 572 एकर जमीन ही उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील आहे. उत्तर प्रदेशात लष्कराची 1 हजार 927 एकर जमीन भू-माफियांच्या ताब्यात आहे. तर मध्य प्रदेशातील 1हजार 660 एकर आणि महाराष्ट्रातील 985 एकर जमीन अजूनही भू-माफियांच्या ताब्यात आहे. तसेच पश्चिम बंगालमधील लष्कराच्या 560 एकर जमिनीवर बेकायदेशीरपणे कब्जा करण्यात आला आहे.

जमिनींवरील ताबा सोडायला तयार नाही

सैन्याच्या जमिनींवर अतिक्रमण केल्यानंतर अतिक्रमणकारी सहजासहजी जमिनींवर ताबा सोडण्यास तयार होत नसल्याचे चित्र आहे. गेल्या 5 वर्षांत केवळ 1 हजार एकर जमीन अतिक्रमणकारकांच्या ताब्यातून सोडवण्यास यश मिळाले आहे. विशेष म्हणजे, तीन राज्यांमध्ये लष्कराच्या जमिनींवर सर्वाधिक अतिक्रमण असून, गेल्या पाच वर्षात या राज्यांतील सर्वात कमी क्षेत्रावरील अतिक्रमण हटवण्यात यश आलं आहे. यात उत्तर प्रदेशातील 435 एकर जमिनीवरील अवैध अतिक्रमण हटवण्यात आलं. मध्य प्रदेशातील केवळ 43 एकर तर महाराष्ट्रातील 36 एकर जमीन अतिक्रमणमुक्त होऊ शकली.

( हेही वाचा: मालेगाव बॉम्बस्फोट : हिंदुत्ववाद्यांविरोधात कारस्थान! साक्षीदाराचा धक्कादायक खुलासा )

राज्यनिहाय अतिक्रमण एकरात

उत्तर प्रदेश (1927.0671) मध्य प्रदेश (1660.0222) महाराष्ट्र (985.1292) पश्चिम बंगाल (559.555) हरियाणा (504.4691) बिहार (477.0717) राजस्थान (476.4523) आसाम (460.5397) नागालँड (357.53) जम्मू आणि काश्मीर (339.7839) झारखंड (304.912) गुजरात (274.7971) पंजाब (239.4823) छत्तीसगड (165.768) दिल्ली (147.451) कर्नाटक (131.7923) आंध्र प्रदेश (107.4125) तामिळनाडू (92.8186) अरुणाचल प्रदेश (87.8141) तेलंगणा (60.4318) उत्तराखंड (51.7232) हिमाचल प्रदेश (42.7618) अंदमान निकोबार (23.98) मेघालय (11.0855) मणिपूर (6.1308) गोवा (5.1166) केरळ (2.6739) त्रिपुरा (1) सिक्कीम (0.2903) लक्षद्वीप (0.08)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.