काकूंचा १८०० रुपयांचा व्हिडिओ अन् यशोमती ठाकूरांची प्रतिक्रिया

164

सोशल मीडियावर कधी कोणती गोष्ट व्हायरल होईल याचा काही नेम नसतो. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. हा व्हिडिओ नुसता धुमाकूळच घालत नाही तर या व्हिडिओमधील १८०० रुपयांचा हिशोब मागणाऱ्या काकू सध्या चर्चेचा विषय ठरल्या आहेत. मात्र या व्हिडिओची दखल खुद्द महिला आणि बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी घेतली आहे.

व्हिडिओवर काय म्हणाल्या यशोमती ठाकूर

घरकाम करणाऱ्या एका महिलेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मेहनत करून घर चालवणाऱ्या या महिलांचा आपण सन्मान केला पाहिजे. या महिला भारतीय अर्थव्यवस्था आणि समाजव्यवस्थेचा कणा आहेत. हिशोबात चूक होणे, हा थट्टेचा विषय होऊ नये. महिला आर्थिक विकास महामंडळातर्फे आर्थिक साक्षरतेवर कार्यक्रम राबवले जातात. ही घटना आम्ही आमच्यासाठी आव्हान म्हणून पाहत आहोत. आर्थिक साक्षरतेचा कार्यक्रम अधिक व्यापक करण्यासाठी आम्ही लवकरच कार्यक्रम हाती घेत आहोत अशी प्रतिक्रिया यशोमती ठाकूर यांनी दिली आहे.

व्हायरल होणाऱ्या व्हिडिओत नेमकं आहे तरी काय?

या व्हिडिओमध्ये घरकाम करणारी महिला काही तरुणांकडे तिच्या कामाचे १८०० रुपये मागत आहे. ते तरुण तिला १८०० रुपये दिले असल्याचे जीव तोडून सांगत आहेत. मात्र, तरीही ती महिला ऐकायला तयार नाही. सदर तरुणांनी महिलेला पाचशे रुपयांच्या तीन नोटा आणि दोनशे रुपयाची एक नोट आणि शंभरची एक नोट, असे अठराशे रुपये दिलेत. महिलेला सुद्धा हे मान्य आहे. ती म्हणते की तुम्ही मला ५०० च्या तीन नोटा दिल्यात हे मला मान्य आहे. पुढे ती म्हणते की तुम्ही मला दीड हजार आणि तीनशे रुपये दिलेत. मात्र, मला माझे अठराशे रुपये हवे आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.