अटकेची टांगती तलवार कायम! नितेश राणेंना जेल की बेल, उद्या निकाल

119

संतोष परब हल्ल्याप्रकरणी जिल्हा सत्र न्यायालय सिंधुदुर्ग येथे सुरू असलेली नितेश राणे यांच्या अर्जावरील अटकपूर्व जामीन याची सुनावणी पूर्ण झाली. मात्र, न्यायालयाने यावर सुनावणी करण्यास आज नकार दिला, यामुळे ही सुनावणी उद्यावर गेली असून आजचा युक्तिवाद संपला असला तरी जामीन अर्जावर उद्या निर्णय होणार आहे.

पोलिसांकडून नितेश राणेंचा शोध सुरू

संतोष परब हल्लाप्रकरणी नितेश राणेंच्या यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम आहे. नितेश राणेंना जेल होणार की बेल मिळणार हे जाणून घेण्यासाठी उद्यासाठी राखून ठेवण्यात आलेल्या सुनावणीच्या निर्णयावर अवलंबून आहे. मात्र आजच्या सुनावणीत ज्यांच्यावर हल्ला झाला ते संतोष परब न्यायालयातून बाहेर पडताना माध्यमांसमोर आले मात्र त्यांनी बोलण्यास नकार दिला. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत यांचे निकटवर्तीय असलेल्या संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणात भाजपा आमदार नितेश राणे यांना अटकेचा वॉरंट निघाला आहे. यानंतर पोलिसांकडून नितेश राणे यांचा शोध सुरू आहे.

(हेही वाचा – दहिसरमध्ये भरदिवसा SBI बँकेत गोळीबार, एका कर्मचाऱ्याचा मृत्यू)

नितेश राणे कुठे? असे विचारल्यावर काय म्हणाले राणे…

नितेश राणेंच्या नितेश राणे कुठे आहेत, असा सवाल विचारल्यावर हे सांगायला आम्ही मूर्ख आहोत का, असे नारायण राणेंनी सांगितले. आता याबाबतच पोलिसांनी राणेंना नोटीस बजावली असून, त्यांच्याकडून नितेश राणेंची माहिती घेण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.