कोविड रुग्णवाढीचा डबल धमाका! ऐकाल तर उडेल थरकाप

113

कोविड रुग्ण वाढीच्या स्फोटाची तीव्रता आता अधिकच वाढू लागली असून बुधवारी दिवसभरात ज्या संख्येची भीती होती, तोच आकडा गाठला गेला. दिवसभरात मंगळवारच्या १ हजार ३७७ रुग्णांच्या तुलनेत बुधवारी अगदी दुप्पटीच्या जवळपास रुग्ण संख्या वाढलेली पाहायला मिळाली असून एकूण २ हजार ५१० रुग्णांची नोंद झाली आहे. दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर ८०० पेक्षा अधिक बाधित रुग्णांची संख्या आढळून आल्यानंतर कडक निर्बंध लागू करण्यात आले होते. परंतु यावेळी ७५ टक्क्यांहून अधिक नागरिकांचे लसीकरण झाल्याने अडीच हजारांपर्यंत प्रतीक्षा करूनच लॉकडाऊनचा निर्णय घेतला जाण्याचा विचार आहे. त्यामुळे बाधित रुग्णांनी अडीच हजारांचा आकडा गाठल्याने आपण आता लॉकडाऊनच्या अगदी समीप पोहोचलो आहोत.

रुग्णवाढीचा दर वाढला

मंगळवारी दिवसभरात जिथे ३२ हजार ३६९ चाचणी केल्यानंतर १३७७ बाधित रुग्ण आढळून आले होते, तिथे बुधवारी ५१ हजार ८४३ चाचण्या करण्यात आल्यानंतर २५१० रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे एका दिवसातच सुमारे १२००च्या आसपास रुग्णवाढ झाली आहे. तर दिवसभरात २५१ रुग्ण बरे होऊन घरी परतले. तर मंगळवारी विविध रुग्णालयांमध्ये व कोविड सेंटरमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या ५ हजार ८०३ एवढी होती, ही संख्या बुधवारी ८ हजार ६० वर पोहोचली आहे. तर मृत्यू पावलेल्या रुग्णांची संख्या एक एवढी आहे. मृत्यूचा आकडा कमी झाला असला रुग्ण दुपटीचा दर हा ६८२ दिवस एवढा आहे.

मुंबईत सक्रिय कंटेन्मेंट झोन असलेल्या झोपडपट्टी व चाळीची संख्या एक असली तरी इमारती व सीलबंद इमारतींच्या संख्येतही वाढ होत मंगळवारच्या तुलनेत बुधवारी ३७ वरून ४५ वर पोहोचली पोहोचली आहे.

( हेही वाचा : मिठी नदीच्या अर्धवट पुलाकडे विरोधी पक्षांसह पहारेकऱ्यांचा कानाडोळा! )

मागील तेरा दिवसांमधील बाधित रुग्णांची आकडेवारी

२९ डिसेंबर २१: चाचण्या ५१, ८४३, बाधित रुग्ण- २५१०, मृत्यू-१,बरे झालेले रुग्ण- २५१

२८ डिसेंबर २१ : चाचण्या -३२,३६९, बाधित रुग्ण – १३७७, मृत्यू -१, बरे झालेले रुग्ण -३३८

२७ डिसेंबर २१ : चाचण्या -४३,३८३, बाधित रुग्ण – ८०९, मृत्यू -३, बरे झालेले रुग्ण -३३५

२६ डिसेंबर २१ : चाचण्या -३४,८१९, बाधित रुग्ण – ९२२, मृत्यू -२, बरे झालेले रुग्ण -३२६

२५डिसेंबर २१ : चाचण्या -४२,४२७ बाधित रुग्ण – ७५७, मृत्यू -०, बरे झालेले रुग्ण -२८०

२४ डिसेंबर २१ : चाचण्या -४०,४७२, बाधित रुग्ण – ६८३, मृत्यू -१, बरे झालेले रुग्ण -२६७

२३ डिसेंबर २१ : चाचण्या -३९,४२३, बाधित रुग्ण – ६०३, मृत्यू -१, बरे झालेले रुग्ण -२०७

२२ डिसेंबर २१ : चाचण्या -४५,०१४, बाधित रुग्ण – ४०९, मृत्यू -०, बरे झालेले रुग्ण -२२९

२१ डिसेंबर २१ : चाचण्या – ३७,९७३, बाधित रुग्ण – ३२७, मृत्यू -१, बरे झालेले रुग्ण -२२७

२० डिसेंबर २१ : चाचण्या -३०,६७२, बाधित रुग्ण – २०४, मृत्यू -०, बरे झालेले रुग्ण -२२९

१९ डिसेंबर २१ : चाचण्या -४०,८५७, बाधित रुग्ण – ३३६, मृत्यू -२, बरे झालेले रुग्ण -२०१

१८डिसेंबर २१ : चाचण्या -५१,१७१, बाधित रुग्ण – २८३, मृत्यू -०, बरे झालेले रुग्ण -२७५

१७ डिसेंबर २१ : चाचण्या -५१,२६६ बाधित रुग्ण – २९५, मृत्यू -१, बरे झालेले रुग्ण -२२७

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.