…एकट्या वाघाची शिकार करू शकत नाही! राणे समर्थकांची बॅनरबाजी

119

संतोष परब हल्लाप्रकरणात भाजप आमदार नितेश राणे अडचणीत सापडले आहेत. त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे राणे यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत यांचे निकटवर्तीय असलेल्या संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणात भाजप आमदार नितेश राणे यांना अटक होणार असून त्यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर न्यायालयात सुनावणी सुरू आहे. यामुळेच नितेश राणे यांच्या समर्थनार्थ दादर परिसरात बॅनरबाजी करण्यात आली होती. मात्र हे बॅनर पोलिसांनी तात्काळ काढून टाकले आहेत.

राणे समर्थकांची बॅनरबाजी

Bannerशंभर कुत्री मिळून एकट्या वाघाची शिकार करू शकत नाही, अशा स्वरुपाचे बॅनर राणे समर्थकांनी लावले होते. विशेष म्हणजे या बॅनरवर केंद्रीय मंत्री नारायण राणेंचाही फोटो झळकला आहे. या बॅनरबाजीसंदर्भात माहिती मिळताच दादर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत हे बॅनर खाली उतरवले आहेत. दरम्यान, या बॅनरबाजीमुळे वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

( हेही वाचा :  सरत्या वर्षात रेल्वेची महाराष्ट्रात कशी होती कामगिरी? जाणून घ्या… )

नारायण राणे यांचा आरोप

नितेश राणे यांनी आदित्य ठाकरेंची खिल्ली उडवल्यानंतर शिवसेना अधिकच आक्रमक झाली असून, त्यामुळेच नितेश राणेंना एका प्रकरणात अटक करण्यासाठी संपूर्ण पोलिस यंत्रणा कामाला लावल्याचा आरोप नारायण राणे यांनी केला आहे. नितेश राणे यांच्या अटकेसाठी पोलिस सिंधुदुर्गात ठिकठिकाणी शोध घेत आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.