छत्तीसगड येथे झालेल्या धर्म संसदेत कालीचरण महाराज यांनी मोहनदास करमचंद गांधी यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य केले. त्यामुळे वाद निर्माण झाला, आता हे कमी म्हणून काय अभिनेते नसिरुद्दीन शहा यांनी धर्मांधपणे भडकावू वक्तव्य केले. मुस्लिमांना भयभीत करण्याचे, घाबरवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. पण आम्ही मुस्लिम 20 कोटी (200 मिलियन) आहोत. हा आकडा खूप साधा का वाटतो? आम्ही 20 कोटी लढू, आम्हा 20 कोटी मुस्लिमांचा ह्याच देशावर दावा आहे, आम्हा 20 कोटींसाठी हीच मातृभूमी आहे. आम्ही इथेच जन्मलोत. आमच्या कित्येक पिढ्या इथेच जन्मल्या आणि गेल्या. आणि मला खात्रीय, की जर कुणी असा मुस्लिमांविरोधात प्रयत्न केलाच तर त्याचा प्रचंड विरोध केला जाईल. ती प्रतिक्रिया संतप्त असेल, असे शहा म्हणाले.
…तर मुस्लिमांची संतप्त प्रतिक्रिया
धर्म संसदेतल्या वादग्रस्त वक्तव्यावर बोलताना शहा म्हणाले, या लोकांना ते काय बोलत आहेत हे तरी कळते की नाही. कारण ते जे काही बोलण्याचा प्रयत्न करतात ते एक नागरी युद्ध आहे. मुस्लिमांना भयभीत करण्याचे, घाबरवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. पण आम्ही मुस्लिम 20 कोटी आहोत. हा आकडा खूप कमी वाटतो का? आम्ही 20 कोटी मुस्लिम लढू, आम्हा 20 कोटी मुस्लिमांचा ह्याच देशावर दावा आहे, आम्हा 20 कोटींसाठी हीच मातृभूमी आहे. आम्ही इथेच जन्मलो आहोत. आमच्या कित्येक पिढ्या इथेच जन्मल्या आणि गेल्या. जर कुणी मुस्लिमांच्या विरोधात जाण्याचा प्रयत्न केला, तर त्याचा प्रचंड विरोध केला जाईल. ती प्रतिक्रिया संतप्त असेल, असे शहा म्हणाले.
(हेही वाचा अजित पवार पहाटेच्या शपथविधीला जाणार, यातही होती पारदर्शकता…पुस्तकात होईल स्पष्ट)
मुघलांनी देशाची उभारणी केली
मुघलांनी केलेले अत्याचार पुन्हा पुन्हा अधोरेखित केले जातात. पण मुघलांनी देशाच्या उभारणीत दिलेले योगदान विसरले जाते. मुघलांनीच ऐतिहासिक स्मारके निर्माण केली. गौरवशाली इतिहास त्यांनी दिला. संगीत, साहित्य, सांस्कृतिक, नृत्य, गायन, चित्रकला यांच्या परंपरा मुस्लिमांनी निर्माण केल्या. तैमूरबद्दल कुणी बोलत नाही, नादीर शाह बद्दलही कुणी बोलत नाही, गजनीही नाही कारण ते इतिहासाशी सुसंगत नाहीत. ते आले आणि लुटून गेले. पण मुघल ह्या देशात आले आणि त्यांनी ही भूमी त्यांची केली. त्यांना हवे तर तुम्ही रेफ्यूजी म्हणू शकता. आणि मुस्लिम शासकांनी केलेल्या अत्याचाराबाबत आज प्रत्येक मुसलमानाला जबाबदार धरणे हे हास्यास्पद आहे, असेही शहा म्हणाले.
Join Our WhatsApp Community