आता आणखी एका मंत्र्याला कोरोनाची लागण

158

राज्यात सध्या कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढला आहे. हा कोरोना थेट मंत्र्यांनाही होऊ लागला आहे. हिवाळी अधिवेशनात भाजपाचे आमदार सागर मेघे यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. त्यानंतर शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनाही कोरोनाची लागण झाली. आता आणखी एका मंत्र्याला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.

मंत्री तनपुरे यांना कोरोना

राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांना कोरोनाची लागण झाली आहे. या संदर्भात त्यांनी स्वतः ट्विट करून माहिती दिली आहे. तनपुरे यांनी बुधवारी रात्री केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. तब्येत व्यवस्थित आहे. गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली काळजी घ्यावी. कोरोना सदृश्य लक्षणे आढळल्यास त्वरित उपचार सुरू करावेत. तनपुरे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत. ते राहुरी-पाथर्डी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. त्यांच्याकडे आदिवासी, उच्च आणि तंत्र शिक्षण, नगरविकास आणि आपत्ती व्यवस्थापन आणि मदत पुनर्वसन या विभागाच्या राज्यमंत्री पदाची जबाबदारी आहे. गेल्या दोन दिवसांत शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे आणि त्यांच्या कुटुंबियांना देखील कोरोनाची लागण झाली आहे.

(हेही वाचा अजित पवार पहाटेच्या शपथविधीला जाणार, यातही होती पारदर्शकता…पुस्तकात होईल स्पष्ट)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.