नितेश राणेंचा जामीन अर्ज फेटाळला, न्यायालयाचा मोठा झटका

108

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सतीश परब यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी भाजपचे नेते, आमदार नितेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला, त्यामुळे त्यांना अटकेची शक्यता लक्षात घेऊन नितेश राणे यांनी तातडीने सिधुदुर्ग सत्र न्यायालयात अटकपूर्व जमीन अर्ज दाखल केला. त्यावर बुधवार आणि गुरुवारी सलग दोन दिवस सुनावणी झाली. त्यानंतर गुरुवारी, ३० डिसेंबर रोजी संध्याकाळी यावर न्यायालयाने अंतिम निर्णय दिला. त्यामध्ये राणे यांचा अटकपूर्व जामीन फेटाळण्यात आला आहे. त्यामुळे नितेश राणे आता तातडीने उच्च न्यायालयात धाव घेणार असल्याचे सांगितले जात आहे.

उद्या उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज करणार

बेपत्ता असलेले भाजप आमदार नितेश राणे यांना सिंधुदुर्ग सत्र न्यायालयाकडून मोठा झटका मिळाला आहे. शिवसेनेच्या संतोष परब हल्ला प्रकरणात नितेश राणे आणि गोट्या सावंत यांचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळला. दोन दिवस चाललेल्या युक्तिवादानंतर आज जिल्हा सत्र न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश एस व्ही हांडे यांनी अटकपूर्व जामीन नाकारला. दरम्यान, नितेश राणेंचे वकील उद्या उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करणार असल्याचे सांगितले जाते आहे.

काय म्हणाले नितेश राणेंचे वकील

नितेश राणे प्रकरणात दोन दिवस चाललेल्या युक्तिवादानंतर नितेश राणेंचे वकील आणि सरकारी वकिलांनी आपली बाजू मांडली. नितेश राणेंनी शिवसैनिक संतोष परब यांच्या हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी त्यांच्यावर आरोप करण्यात आला होता. तर नारायण राणे सध्या नॉट रिचेबल असून पोलिसांकडून त्यांचा शोध घेत आहेत. तर नितेश राणेंना उच्च न्यायालयात जाण्याचा अधिकार आहे. जामीन मिळवण्यासाठी आम्ही उच्च न्यायालयात जाऊ, तोपर्यंत नितेश राणेंना पोलिसांसमोर हजर राहण्याची गरज नाही, असे नितेश राणेंचे वकील संग्राम देसाई यांनी सांगितले.

तसेच, संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा आणि नितेश राणेंचा कोणताही संबंध नसल्याचेही अॅड. देसाई यांनी सांगितले. तर, सरकारी वकील प्रदीप घरत यांनी हा युक्तिवाद खोडून काढण्याचा प्रयत्न केला. नितेश राणे हे पोलीस तपासात सहकार्य करत नसल्याचे सरकारी वकील घरत यांनी सांगितले. सरकारी वकील आणि नितेश राणेंचे वकील यांच्यात खडाजंगी झाली. याप्रकणी सरकारी वकील हे वेळ काढण्याचे काम करत असल्याचा आरोप नितेश राणेंचे वकील संग्राम देसाई यांनी केला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.