पंतप्रधानांच्या हस्ते उत्तराखंडमध्ये 23 प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी

124

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज, गुरुवारी उत्तराखंडमध्ये 17 हजार 500 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या 23 प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. 1976 मध्ये पहिल्यांदा ज्या प्रकल्पाची संकल्पना मांडण्यात आली आणि त्यानंतर तो प्रकल्प अनेक वर्षांपासून प्रलंबित होता अशा लाखवार बहुउद्देशीय प्रकल्पाची पायाभरणी त्यांनी केली. त्यांनी 8700 कोटी रुपयांच्या रस्ते प्रकल्पांचे देखील उद्घाटन आणि पायाभरणी केली.

(हेही वाचा – मुंबईत एकाच दिवसात ३६१० नवे रुग्ण! बाबांनो, आता तरी मास्क लावा!)

या रस्ते प्रकल्पांमुळे दुर्गम, ग्रामीण आणि सीमावर्ती भागात कनेक्टिव्हिटी सुधारण्याचे पंतप्रधानांचे स्वप्न प्रत्यक्षात येईल. कैलास मानसरोवर यात्रेसाठी देखील सुधारित दळणवळण सुविधा उपलब्ध होतील. उधम सिंग नगर येथे एम्स ऋषिकेश सॅटेलाईट सेंटर आणि पिथौरागढ येथील जगजीवन राम शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची पायाभरणीही त्यांनी केली. ही सॅटेलाईट सेंटर्स देशाच्या सर्व भागात जागतिक दर्जाच्या वैद्यकीय सुविधा पुरविण्याच्या पंतप्रधानांच्या प्रयत्नांना अनुसरून असतील. त्यांनी काशीपूर येथे अरोमा पार्क आणि सितारगंज येथे प्लॅस्टिक इंडस्ट्रियल पार्क आणि राज्यभरात गृहनिर्माण, स्वच्छता आणि पिण्याच्या पाण्याच्या पुरवठ्याशी संबंधित अनेक उपक्रमांची पायाभरणी केली. यावेळी एका सार्वजनिक सभेला संबोधित करताना पंतप्रधानांनी कुमाऊंसोबत त्यांचे प्रदीर्घ काळापासून संबंध असल्याची आठवण करून दिली आणि त्यांना उत्तराखंडी टोपी देऊन सन्मानित केल्याबद्दल प्रदेशातील लोकांचे आभार मानले.

‘हे दशक उत्तराखंडचे दशक ठरणार’

यावेळी पंतप्रधान म्हणाले की, उत्तराखंडमधील लोकांचे सामर्थ्य या दशकाला उत्तराखंडचे दशक बनवेल, असे पंतप्रधान म्हणाले. उत्तराखंडमध्ये वाढणारी आधुनिक पायाभूत सुविधा, चार धाम प्रकल्प, नवीन रेल्वे मार्ग बांधले जात आहेत, यामुळे हे दशक उत्तराखंडचे दशक ठरेल. जलविद्युत, उद्योग, पर्यटन, नैसर्गिक शेती आणि संपर्कव्यवस्था या क्षेत्रात उत्तराखंडने केलेल्या प्रगतीचाही त्यांनी उल्लेख केला ज्यामुळे हे दशक उत्तराखंडचे दशक होईल असे त्यांनी सांगितले. राज्यातील उधम सिंग नगर येथे एम्स ऋषिकेश उपग्रह केंद्र आणि पिथौरागढ येथील जगजीवन राम शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या पायाभरणीमुळे राज्यातील वैद्यकीय पायाभूत सुविधा मजबूत होतील. ते म्हणाले की, आज सुरू होणाऱ्या प्रकल्पांसह राज्यातील कनेक्टिव्हिटी सुधारेल.

‘तुमची प्रत्येक गरज पूर्ण करणे ही आमची जबाबदारी’

सीमावर्ती राज्य असूनही संरक्षणाशी संबंधित अनेक गरजांकडे दुर्लक्ष करण्यात आल्याबद्दल पंतप्रधानांनी शोक व्यक्त केला. कनेक्टिव्हिटीसोबतच राष्ट्रीय सुरक्षेच्या प्रत्येक बाबीकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. ते म्हणाले की सैनिकांना कनेक्टिव्हिटी, आवश्यक चिलखत, दारूगोळा आणि शस्त्रास्त्रे आणि हल्लेखोर आणि दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर देण्यासाठी देखील प्रतीक्षा करावी लागत होती. उत्तराखंडला विकासाचा वेग वाढवायचा आहे. ते म्हणाले, “तुमची स्वप्ने आमचे संकल्प आहेत; तुमची इच्छा आमची प्रेरणा आहे; आणि तुमची प्रत्येक गरज पूर्ण करणे ही आमची जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.