शिक्षण विभागातील घोटाळ्यांचे सत्र सुरुच, आता शेकडो…

122

राज्यातील परीक्षांमधील घोटाळ्यांचे सत्र पाहता राज्यात मुलांच्या भविष्याबाबत चाललेला खेळ चव्हाट्यावर आला आहे. शालेय शिक्षण विभागात चाललेला हा गैरकारभार एवढाच मर्यादित न राहता, आता शिक्षकांच्या नियुक्त्यांमधील घोटाळा समोर आला आहे. 2012 पासून शिक्षक भरती बंद असताना हजारो शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

चौकशी आयोग स्थापन करण्याची मागणी 

राज्यातील स्वयंसेवी संघटनांच्या कार्यकर्त्यांसोबत शिक्षणतज्ज्ञांनी या शिक्षक भरतीच्या घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी थेट न्यायाधीशांमार्फत चौकशी आयोग स्थापन करण्याची आणि शिक्षक भरतीची श्वेतपत्रिका काढण्याची मागणी केली आहे. यासाठी माध्यमिक शिक्षण संचालक महेश पालकर यांची भेट घेऊन त्यासाठीचे निवेदन दिले आहे. आयुक्तांशी फोनवर चर्चा करुन यावर कार्यवाही करण्याचा आग्रह धरला आहे.

( हेही वाचा: सावधान! कोरोना वाढतोय… केंद्राकडून ‘या’ 8 राज्यांना विशेष निर्देश! )

घोटाळा खूप गंभीर 

राज्यातील शेकडो अनुदानित शाळांमध्ये 2012 नंतर शिक्षक भरती बंद असताना हजारो शिक्षकांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. त्यासाठी संस्थाचालक, शिक्षणाधिका-यांच्या संगनमताने शिक्षक भरतीचा घोटाळा झाला असून, त्यावर विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात अनेकदा चर्चा झाल्या. अहवाल तयार झाला मात्र, अंमलबजावणी झाली नाही. यामुळे हा घोटाळा खूप गंभीर असल्याने त्याच्या चौकशीसाठी आयोगाची गरज आहे. 2012 ते 2021 या काळातील सर्व नेमणुका तपासण्याची गरज असून, याबाबत सरकारने श्वेतपत्रिका प्रसिद्ध करुन समाजासमोर सत्य मांडावे, अशी मागणी या शिक्षणतज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.