केंद्र सरकारने जीएसटीमध्ये वाढ केली आहे. जीएसटीमध्ये झालेल्या या वाढीमुळे नवीन वर्षात महागाईचा भडका उडण्याची शक्यता आहे. जीएसटी वाढल्याने वस्तूंचे दर आपोआप वाढणार आहेत. आधीच पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसली आहे. त्यातच आता ऑनलाईन खरेदी करणे महागणार आहे.
कपडे महागणार
1 जानेवारी 2022 पासून जीएसटीचे नवे दर लागू होणार आहेत. कपडे आणि चामड्यांच्या उत्पादनावरील जीएसटीमध्ये वाढ करण्यात येणार आहे. याआधी या वस्तूंवर 5 टक्के जीएसटी आकारण्यात येत होता, मात्र आता तो वाढून 12 टक्के करण्यात आला आहे. जीएसटी वाढल्यामुळे आपोआपच कपडे आणि चामड्याची उत्पादने जसे चपला, पर्स पाकिटे महाग होण्याची शक्यता आहे.
ओला उबेर राईड महागणार
ओला उबेरची प्रवासी सेवा देखील येत्या एक जानेवारीपासून महागणार आहे. ओला उबेरच्या राईडसाठी तुम्हाला आता पूर्वीपेक्षा अधिक पैसे मोजावे लागू शकतात. मात्र इतर प्रवासी वाहनाचे दर स्थिर राहण्याची शक्यता आहे.
( हेही वाचा :नव्या वर्षात काही प्लॅन बनवताय? जाणून घ्या राज्य सरकारचे नवे निर्बंध )
ऑनलाईन फूडदेखील जीएसटीच्या कक्षेत
स्विगी, झोमॅटोसारख्या ऑनलाईन फूड डिलेव्हरी करणाऱ्या कंपन्यांनादेखील जीएसटीच्या कक्षेत आणले जाणार आहे. ऑनलाईन फूडवरदेखील जीएसटी लावण्यात येणार असल्याने, ऑनलाईन फूडसाठी ग्राहकांना आता अधिक पैसे मोजावे लागणार आहेत.
Join Our WhatsApp Community