सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणूक : पोस्टरवॉर सुरु, मुंबईत मात्र नितेश राणेंची धामधूम

198

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा निकाल लागला असून त्यामध्ये भाजपचा विजय झाला आहे. महाविकास आघाडीचा पराभव झाला आहे. यामुळे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जिल्ह्यावर असलेली पकड कायम असल्याचे दिसून आले आहे. मतदानाच्या आधी २ दिवसांपासून या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोरदार बॅनरबाजी सुरु होती. यात कालपर्यंत नितेश राणे यांच्यावर टीका करणारा बॅनर सर्वत्र लावण्यात येत होता, जसा निवडणुकीचा निकाल लागला तसे नितेश राणेंच्या समर्थनार्थ बॅनरबाजी सुरु झाली. निवडणूक सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची असली तरी मुंबईत चर्चा मात्र नितेश राणेंची सुरु झाली आहे.

हरवला आहे!

शिवसैनिक संतोष परब मारहाण प्रकरणी भाजपा आमदार नितेश राणेंचा अटकपूर्व जामीन अर्ज सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. त्यामुळे आता नितेश राणेंवर अटकेची टांगती तलवार अद्याप कायम आहे. शुक्रवारी नितेश राणे यांचे वकील सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देत मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जमीन अर्ज करणार आहेत. मात्र सध्या नितेश राणे हे गायब आहेत त्यावरून शिवसेनेने मुंबईत नितेश राणेंच्या विरोधात बॅनरबाजी केली आहे. ‘हरवला आहे’ या आशयाचा बॅनर  मुंबईत लावण्यात आले. माहिती देणाऱ्याला कोंबडी बक्षीस देण्यात येईल असेही म्हटले. या बॅनरच्या विरोधात भाजपचे नेते प्रसाद लाड यांनी मुंबईत विविध पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल करत या बॅनरवरची भाषा असभ्य असल्याचे म्हटले आहे.

nitesh1

(हेही वाचा सिंधुदुर्गात आज राणे समर्थकांची आतषबाजी! सतीश सावंत पराभूत! जिल्हा बँकेवर भाजपचा झेंडा)

नितेश राणेंच्या समर्थनार्थ बॅनरबाजी 

तर दुसरीकडे नितेश राणेंच्या समर्थनार्थ बॅनर लावण्यात आले. त्यामध्ये ‘जिंकण्याची जिद्द अशी ठेवा की आपल्याला हरवण्यासाठी प्रयत्न नव्हे तर कट रचले पाहिजेत’, असे म्हटले आहे.

Nitesh2

निवडणुकीचे निकाल लागल्यावर जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांचा पराभव झाला. त्यामुळे लागलीच नितेश राणे यांचा फोटो असलेल्या बॅनर लावण्यात आला. यात नितेश राणे हे पाय देऊन उभे आहेत, त्यांच्या पायाखाली सतीश सावंत आहेत, त्या फोटोवर ‘गाडलाच’ असे म्हटले आहे.

nitest post

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.