आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रत्येक जण कर्जाचा आधार घेत असतो. कोणी घर घेण्यासाठी कर्ज घेतं, तर कोणी गाडी घेण्यासाठी कर्ज घेतं असतं, पण हे कर्ज घेतल्यानंतर जर त्या व्यक्तीचा अकस्मात मृत्यू झाला, तर त्याने काढलेल्या कर्जाचे पुढे काय होते आणि त्याचे कर्ज कोण फेडते, असा प्रश्न जर तुम्हालाही पडला असेल, तर त्या कर्जाचे पुढे काय होते त्यासाठी बॅंकेच्या काय अटी आहेत ते आपण या बातमीमधून जाणून घेऊया.
यासंदर्भात बॅंकांचे नियम जाणून घेऊया
गृहकर्ज अटी
- जेव्हा गृहकर्ज घेतले जाते तेव्हा त्याऐवजी घराची कागदपत्रे व्यक्तीकडून गहाण ठेवली जातात, म्हणजे घर गहाण आहे. व्यक्तीचा मृत्यू झाल्यास कर्जाची परतफेड करण्याचा भार सहकर्जदारावर असतो किंवा त्या व्यक्तीच्या वारसाद्वारे दिली जाऊ शकते.
- सहकर्जदाराला ही जबाबदारी तेव्हाच मिळते जेव्हा तो कर्जाची परतफेड करण्याच्या स्थितीत असतो, तसे न झाल्यास बँक घराचा लिलाव करून रक्कम वसूल करते.
- पण आजकाल बँकाही नवीन पद्धतीने कर्ज घेतात, जिथे व्यक्तीचा आधीच विमा उतरलेला असतो. त्यानंतर त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास बँका त्यांचे पैसे या विम्यामधून वसूल करतात. त्यामुळे कर्ज घेताना या विम्याची माहिती नक्की घ्या.
( हेही वाचा: आनंदाची बातमी! एलपीजी सिलिंडरच्या किमती 100 रुपयाने घसरल्या! )
वैयक्तिक कर्जासाठी नियम
वैयक्तिक कर्ज सुरक्षित नसल्यामुळे व्यक्तीच्या मृत्यूनंतर ही जबाबदारी इतर कोणावरही येत नाही किंवा वारसदारही त्याची परतफेड करणार नाहीत. त्यामुळे व्यक्तीच्या मृत्यूबरोबर कर्जही संपते.
वाहन कर्ज नियम
वाहन कर्ज हे सुरक्षित कर्ज आहे, त्यामुळे ते घेतल्यानंतर एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला, तर त्याच्या घरातील कोणीही व्यक्ती त्याची परतफेड करू शकते, अन्यथा बँक कार विकून ते वसूल करते.