नव वर्षाच्या निमित्ताने वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी गेलेल्या भाविकांमध्ये चेंगराचेंगरी झाली आणि 12 भाविकांना यात आपला जीव गमवावा लागला आहे. आता या वैष्णोदेवी चेंगराचेंगरीतील मृतांची स्थिती जाणून घेण्यासाठी केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी वैष्णोदेवी गाठले. या अपघातानंतर शोक व्यक्त करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह आणि नित्यानंद राय यांना घटनेची चौकशी करण्याचे आणि जखमींना योग्य सुविधा उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले. दरम्यान, या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या १२ जणांपैकी ८ जणांची ओळख पटली आहे.
या अपघातातील जखमींची यादी
- ऋषिकेश, मुंबई (वय २३)
- विकास तिवारी, मुंबई (वय ३५)
- सुमित, पठाणकोट, पंजाब (वय २९)
- आयुष, जम्मू (वय २५)
- कपिल, दिल्ली (वय २५)
- नितीन गर्ग, गंगा नगर, राजस्थान (वय ३०)
- भंवरलाल पाटीदा, मंदसौर, मध्य प्रदेश (वय ४७)
- साहिल कुमार, जम्मू (वय २२)
- अध्या महाजन, जम्मू (वय १६)
- प्रशांत हाडा, जयपूर, राजस्थान (वय ३०)
- सरिता, दिल्ली (वय ४२)
- अज्ञात, पुरुष, (३५ वय)
- अज्ञात, महिला, (वय २५)
List of deceased and injured following stampede at Mata #VaishnoDevi shrine. pic.twitter.com/8vyB9tZDqT
— Dr Jitendra Singh (@DrJitendraSingh) January 1, 2022
अपघातात ठार झालेल्या 12 जणांची ओळख पटली आहे
- श्वेता सिंग, वय-35
पतीचे नाव- विक्रांत सिंग
गाझियाबाद - डॉ. अरुण प्रताप सिंग, वय- 30
वडिलांचे नाव- सत प्रकाश सिंह
गोरखपूर - विनीत कुमार, वय- 38
वडिलांचे नाव- वीरमपाल सिंग
सहारनपूर - धरमवीर सिंग, वय-35
सहारनपूर - विनय कुमार, वय- 24
वडिलांचे नाव- महेश चंद्र
भदेरपूर, दिल्ली - सोनू पांडे, वय-24
वडिलांचे नाव- नरिंदर पांडे
भदेरपूर, दिल्ली - ममता, वय- 38
पतीचे नाव- सुरिंदर
बिरी झज्जर, हरियाणा - धीरज कुमार, वय- 26
वडिलांचे नाव- तरलोक कुमार
राजौरी, जम्मू आणि काश्मीर
अपघाताच्या चौकशीसाठी एक उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन करण्यात आली असून, त्यात जम्मू आणि काश्मीरचे अतिरिक्त पोलिस महासंचालक मुकेश सिंग यांचाही समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, त्यांनी अपघातस्थळी जाऊन तिथल्या लोकांशीही चर्चा केली.
( हेही वाचा: नवीन वर्षाच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांनी दिल्या शुभेच्छा! म्हणाले…)
Extremely Saddened by the loss of lives due to Stampede at Shri Vaishno Devi Ji Bhawan.
I wish a speedy recovery to the injured.
Heartfelt condolences for the deceased.
— Ankur Sharma (@AnkurSharma_Adv) January 1, 2022
इक्कजुट्ट जम्मू यांनी शोक व्यक्त केला
इक्कजुट्ट जम्मूने माता वैष्णोदेवी संकुलातील अपघाताबद्दल शोक व्यक्त केला आहे. पक्षाचे अध्यक्ष अंकुर शर्मा यांनी जखमींना लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
Join Our WhatsApp Community