31 डिसेंबरपर्यंत किती प्राप्तिकर विवरणपत्रे दाखल झाली? जाणून घ्या…

124

आयकर विभागाच्या नवीन ई-फायलिंग पोर्टलवर 31 डिसेंबर 2021 या विस्तारित देय तारखेपर्यंत जवळपास 5.89 कोटी प्राप्तिकर विवरणपत्रे  दाखल करण्यात आली आहेत. 31 डिसेंबर 2021 रोजी 46.11 लाखांहून अधिक प्राप्तिकर विवरणपत्रे भरण्यात आली.

लेखा वर्ष 2021-22 साठी 31 डिसेंबरपर्यंत भरल्या गेलेल्या 5.89 कोटी प्राप्तिकर विवरणपत्रांचे प्रकारनिहाय वर्गीकरण पुढीलप्रमाणे 49.6% आयटीआर 2.92 कोटी, 9.3% आयटीआर (54.8 लाख), 12.1% आयटीआर (71.05 लाख), 27.2% आयटीआर (1.60 कोटी), 1.3% आयटीआर (7.66 लाख), आयटीआर (2.58 लाख) आणि आयटीआर (0.67 लाख) आहे. यापैकी 45.7% पेक्षा जास्त आय टी आर पोर्टलवर ऑनलाइन ITR फॉर्म वापरून दाखल केले गेले आहेत आणि उर्वरित ऑफलाइन सॉफ्टवेअर युटिलिटीजमधून तयार केलेल्या ITR वापरून अपलोड केले गेले आहेत.

(हेही वाचा रुग्ण वाढ तरीही रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण कमी)

शेवटच्या दिवशी 46.11 लाख भरली प्राप्तिकर विवरणपत्रे 

10 जानेवारी 2021 लेखा वर्ष 2020-21 साठी आयटीआरची विस्तारित देय तारीखपर्यंत, दाखल केलेल्या आयटीआरची एकूण संख्या 5.95 कोटी होती आणि शेवटच्या दिवशी म्हणजे 10 जानेवारी 2021 रोजी 31.05 लाख आयटीआर दाखल झाले होते. त्या तुलनेत या वर्षाच्या शेवटच्या दिवशी 46.11 लाख प्राप्तिकर विवरणपत्रे भरण्यात आली. सर्वांना सुरळीत आणि स्थिर करदाता सेवेचा अनुभव सुनिश्चित करण्यासाठी आम्ही अथक परिश्रम करण्याच्या आमच्या संकल्पाचा पुनरुच्चार करतो, असे म्हणत विभागाने करदाते, कर सल्लागार, कर व्यावसायिक आणि इतर ज्यांनी हे शक्य केले त्यांच्या योगदानाप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे .

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.