११ नोव्हेंबर २०२१ पासून राष्ट्रसूर्य दिनदर्शिका वितरण करण्यास सुरुवात केली. १०,००० घरात या दिनदर्शिकेच्या माध्यमातून वीर सावरकरांचे दुर्मिळ दर्शन सावरकरप्रेमींना घडवणे हे या वर्षीचे लक्ष्य होते. याचं बरोबर त्यांचे विचार आणि त्यांच्या आयुष्यातील महत्वाच्या घटना दिनविशेष स्वरूपात सर्वांसमोर मांडणे हा देखील प्रमुख हेतू स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्थेचा
(अंधश्रद्धा निवारण विज्ञानवादी विचारप्रणाली) होता.
सलग ५० दिवसात १०,००० घरात राष्ट्रसूर्य
राष्ट्रसूर्य दिनदर्शिका २०२२ चे वितरण सुरू झाल्यानंतर या वर्षीची दिनदर्शिका सावरकर प्रेमींच्या पसंतीस उतरत आहे. इतकेच नाही, तर दिनदर्शिकेची मागणी वाढत असल्याचे दिसून आले. नियोजनाप्रमाणे दररोज २०० याप्रमाणे १ जानेवारी पर्यंत म्हणजे केवळ ५० दिवसांत १०,००० घरात ही दिनदर्शिका पोहोचवण्यात यश आले.
दिनदर्शिकेच्या माध्यमातून सावरकरांचे दुर्मिळ दर्शन सावरकरप्रेमींना घडविण्यासाठी मोठी टीम संपूर्ण महाराष्ट्रातून सलग ५० दिवस न थांबता घरोघरी सावरकर उपक्रम यशस्वी करण्यासाठी धडपडत होती. यामध्ये अतुल रेणावीकर, सार्थक गोसावी, ओंकार देशपांडे, गोकुळ लामतुरे, शिरीष पाठक, अपूर्वा बापट, आशुतोष पाठक, मिताली कुलकर्णी, सागर बर्वे, सागर बेल्हेकर, सुबोध धामणगावकर, प्रचेत बागेवाडीकर, किरण गोटीमुकुल, नितीन गोडबोले, पराग जोशी, स्वप्नजा वाळवदकर, रोहित मुणगेकर, रोहित भांडारकर, महेश पाठक, इनामदार, नेहा गाडगीळ, शीतल परदेशीं, योगेश कुलकर्णी या सर्वजणांचा सलग ५० दिवस दिनदर्शिका वितरण करण्यात मोठा वाटा होता. या व्यतिरिक्त देखील बरेच जण होते. या सर्वांच्या प्रयत्नामुळे १०,००० घरात राष्ट्रसूर्य केवळ ५० दिवसात पोहोचवण्यात यश आले असल्याचे स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्रीनिवास कुलकर्णी यांनी सांगितले.
ही दिनदर्शिका लेखक, वक्ते, कलाकार, राजकीय, प्रवचनकार, सैनिक अशा प्रत्येक क्षेत्रातील बऱ्याच मान्यवरांपर्यंत देखील पोहोचवली गेली. दरम्यान, आज दिनांक २ जानेवारी २०२२ रोजी २०२२ वर्षाचे दिनदर्शिका वितरण थांबविले असल्याचे देखील सांगण्यात येत आहे.
दिनदर्शिकेची वैशिष्ट्ये
१) स्वा. सावरकरांचे अगदी दुर्मिळ मुळ छायाचित्र संग्रह आणि त्यातील काही प्रसंगाची माहिती.
२) स्वा. सावरकरांचे मुख्य विचार.
३) तिथी, सण, उत्सव, मराठी महिने, सुट्टी, दिनविषेश.
४) उत्तम गुणवत्ता.
(दिनांक २ जानेवारी २०२२ रोजी २०२२ वर्षाच्या दिनदर्शिकेचे वितरण थांबविण्यात आले आहे)
Join Our WhatsApp Community