गेल्या वर्षी एप्रिल-मे महिन्यात कोरोनाच्या डेल्टा व्हेरियंटमुळे बाधित झालेल्या रूग्णांच्या फुफ्फुसांवर विषाणूने हल्ला केला होता. त्यावेळी श्वास घेणेही रूग्णाला कठीण झाल्याने ऑक्सिजनची कमतरता सर्वाधिक भासत होती. ओमायक्रॉनची लक्षणे डेल्टाच्या तुलनेत सौम्य आहेत का? यासंदर्भात बोलताना एम्सचे एपिडेमियोलॉजिस्ट डॉ. संजय राय म्हणाले की, समोर आलेल्या आकडेवारीनुसार दिलासादायक बाब म्हणजे डेल्टाच्या तुलनेत तो सौम्य आहे. दक्षिण आफ्रिका मेडिकल असोसिएशनमध्येही डेल्टा व्हेरियंटच्या संसर्गाचा अहवाल प्रसिद्ध झाला यासह यूकेमध्येही याबाबतचे अहवाल प्रसिद्ध झाले आहेत. हे डेल्टा पेक्षा 60 ते 70 टक्के जास्त संसर्गजन्य असल्याचे समोर आले आहे.
ओमायक्रॉन हा डेल्टा इतका जीवघेणा नाही
भारतात ओमायक्रॉनच्या वाढत्या रूग्ण संख्येमुळे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचं थैमान सुरू झाल्याचे म्हटले जात आहे. अशा वेळी कोणत्याही प्रकारची निष्काळजी धोकादायक ठरू शकते. केंब्रिज विद्यापीठाने भारतात दुसऱ्या लाटेचा अचूक अंदाज वर्तवला होता. अशा परिस्थितीत तिसऱ्या लाटेचा इशाराही भारतासाठी मोठा धोका आहे. आतापर्यंत, देशातील २४ हून अधिक राज्यांमध्ये ओमायक्रॉन व्हेरियंटची रूग्ण नोंदवली गेली आहेत. तज्ज्ञांचे मते, काही लोक सामान्य लक्षणं असल्याचे सांगून बेफिकीर होतात, हे योग्य नाही. कोरोना महामारीतील घातक व्हेरियंट डेल्टाच्या तुलनेत ओमायक्रॉनचा धोकाही कायम आहे. मात्र धोका कायम असला तरी ओमायक्रॉन हा डेल्टा इतका जीवघेणा नाही.
(हेही वाचा – ‘भारत माता की जय’ म्हणत, भारतीय जवानांनी दिल्या नववर्षाच्या शुभेच्छा!)
रूग्ण वाढले तर उपचार मिळणं कठीण
ओमायक्रॉनचा संसर्ग जास्त असला तरी हॉस्पिटलमध्ये जाण्याची आवश्यकता भासत नाही, तरीही खबरदारी घेणं का आवश्यक? यावर सर गंगाराम रुग्णालयाचे डॉ. धीरेन गुप्ता यांनी असे सांगितले की, धोका कमी असला तरी, डेल्टा व्हेरियंटने बाधित 100 पैकी 15 जणांना रुग्णालयात जाण्याची गरज भासते. तर ओमायक्रॉनमध्ये, 100 पैकी एक किंवा दोन लोकांना रुग्णालयात जाण्याची वेळ येते. भारतात रुग्ण वाढले तर रुग्णालयांत रूग्णांना वेळेवर उपचार मिळणं कठीण होऊ शकतं. त्यामुळे सावधगिरी बाळगणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच, यावेळी त्यांनी लोकांनी मास्क वापरावे. गर्दीत जाणे टाळण्याची गरज आहे. यासह वारंवार हात धुतले पाहिजे, असेही आवाहन केले आहे.
Join Our WhatsApp Community