1 जानेवारी रोजी उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील काशी विश्वनाथ धामला पाच लाखांहून अधिक भाविकांनी भेट दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नव्याने बांधलेल्या काशी विश्वनाथ धामच्या उद्घाटनाला अगदी काहीच आठवडे झाले आहेत. वाराणसीतील स्थानिक प्रशासनाला इतक्या अभूतपूर्व संख्येने भाविकांची अपेक्षा नव्हती. त्यांना दिवसभरात जास्तीत जास्त एक लाखाच्या जवळपास अभ्यागतांची अपेक्षा होती.
( हेही वाचा : मालमत्ता करात पूर्ण माफी की पुन्हा सूट: महापालिका प्रशासन गोंधळात )
काशी विश्वनाथ धामला भेट देण्यासाठी देशभरात उत्साह
काशीविश्वनाथ येथे महाशिवरात्रीच्या दिवशीही भाविकांची संख्या अडीच लाख होती. मंदिरात उत्सव नसलेल्या दिवशी एवढ्या मोठ्या संख्येने भाविकांनी मंदिरात येणे ही गोष्ट मंदिर प्रशासनासाठी सुद्धा अनपेक्षित होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केल्यानंतर काशी विश्वनाथ धामला भेट देण्यासाठी देशभरात प्रचंड उत्साह निर्माण झालेला आहे.
13 डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुमारे ₹339 कोटी रुपये खर्चून नव्याने बांधलेल्या काशी विश्वनाथ धामच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन केले. 8 मार्च 2019 रोजी पंतप्रधानांच्या हस्ते प्रकल्पाची पायाभरणी करण्यात आली. बाबा विश्वनाथांच्या यात्रेकरू आणि भक्तांची सोय व्हावी, ही पंतप्रधानांची दीर्घकाळची दूरदृष्टी होती. प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात एकूण २३ इमारतींचे उद्घाटन करण्यात आले. श्री काशी विश्वनाथ मंदिरात येणाऱ्या यात्रेकरूंना यात्री सुविधा केंद्र, पर्यटन सुविधा केंद्र, वैदिक केंद्र, मुमुक्षु भवन, भोगशाळा, सिटी म्युझियम, व्ह्यूइंग गॅलरी, फूड कोर्ट यासह विविध सुविधांचा लाभ घेत येत आहे.
Join Our WhatsApp Community