शाळा पुन्हा सुरू झाल्याचा फायदा विद्यार्थ्यांना नुसते समोरासमोर शिकण्याचाच होणार नाही तर कित्येक महिन्यांपासून दूरस्थ शिक्षणानंतर आता त्यांना पुन्हा मित्रांशी आणि शिक्षकांशी नाते जोडण्याची संधी मिळु शकेल. पालक कामावर जाऊ लागल्यावर ते आशवस्त देखील होतील की, त्यांची मुले सुखरुप आणि सुरक्षित वातावरणात रमली आहेत. पण साथीच्या आजाराच्या काळात घरी त्यांना सुरक्षित वाटत होते ते सोडून बाहेर पडायचे आणि इतक्या दिवसांनंतर शिक्षक आणि मित्रांपासून तसे दूर राहण्याने आता सामाजिकरणाच्या चिंतेने ते झुंजत देखील असतील. लॉकडाऊन दरम्यान त्यांनी अनुभवलेले शिक्षणाच्या तोट्यानंतर अभ्यासाशी जुळवून घेणे ही त्यांना भीतीदायक वाटत असेल.
प्रत्यक्ष वर्गांमध्ये सहजतेने रूळण्याची चिंता असलेल्या विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी शाळांनी विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि सुरक्षिततेची पूर्ण काळजी घेतली पाहिजे जेणे करुन त्यांचे शिक्षण सुरळीत चालू राहील. मुलांना असे वातावरण दिले पाहिजे जे त्यांचा परिचयाचे असेल आणि त्यांना समाजशील राहण्यासाठी आणि दुसऱ्यांशी सवांद साधण्यासाठी प्रोत्साहित केले पाहिजे. ज्या मुलांना गरज असेल त्यांना ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही प्रकारे समुपदेशनाची सोय केली गेली पाहिजे. विद्यार्थ्यांचे स्वास्थ्य आणि आरोग्य सुनिश्चित करण्यासाठी सरकारी मार्गदर्शक तत्त्वांचे आणि प्रोटोकॉलचे कडक पालन करणे महत्त्वाचे आहे. कॅम्पसची स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण करण्यापासून सुरुवात करायला हवी आणि विद्यार्थ्यांना सामाजिक अंतराच्या नियमांची आठवण करून देण्यासाठी ठिक-ठिकाणी चिन्ह लावावी. विद्यार्थ्यांना अस्वस्थ वाटत असल्यास शाळा कॅम्पसमध्ये वैद्यकीय सेवा सुविधा देखील ठेवता येवू शकतात.
शाळेत येणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी फेस मास्क घालणे अनिर्वाय करणे गरजेचे आहे आणि ज्या कुटुंबात कोविड-संक्रमित सदस्य असतील त्या विद्यार्थाना घरी बसून अभ्यास करण्याची सल्ला दिला गेला पाहिजे. तसेच ज्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष वर्गांना उपस्थित राहायचे नाही त्यांच्यासाठी ऑनलाइन वर्गही सुरू ठेवले पाहिजेत. हे देखील ध्यानी ठेवले पाहिजे की जास्त लवचिकता विद्यार्थ्यांची निरीक्षण करण्याची आणि त्यांच्या शिकण्याच्या प्रगतीचे मोजमाप करण्याची क्षमतेला कमी करू शकते. शिक्षण सातत्याने सुरळीत राहावे हे सुनिश्चित करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना संक्रमणापासून निर्बाध ठेवून रिमोट
लर्निंगपासून थेट निर्देशापर्यंत आणण्यासाठी मदत करायला हवी. त्या करिता शाळांनी मिश्रित शिक्षण मॉडेल स्वीकारावे. ही संकरित अध्यापन पद्धत शास्त्रीय शिक्षण देण्यासाठी वर्गातील शिक्षण आणि डिजिटल साधनांचे मिश्रित वापर करते. मिश्रित शिक्षण मॉडेल अत्यंत वेगवान आहे आणि शिक्षक आणि विद्यार्थ्यांना उत्क्रांत परिस्थितीशी त्वरित जुळवून घेण्यास उपयोगी ठरते ज्यामुळे शिकण्याचे सातत्य सुनिश्चित राहते.