राज्यातील परीक्षांचा सावळा गोंधळ! एकाच दिवशी होणार ‘या’ दोन्ही परीक्षा

153

राज्यातील परीक्षांचा सावळा गोंधळ काही संपताना दिसत नाहीये. आता राज्य सरकारने म्हाडा आणि एमपीएससीच्या परीक्षा एकाच दिवशी घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे एमपीएससी आणि म्हाडाच्या विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. पेपरफुटीमुळे म्हाडा अर्थात महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र प्राधिकरण विभागाच्या पुढे ढकललेल्या परीक्षा आता घेतल्या जाणार आहेत.  29 जानेवारी 2022 रोजी या परीक्षा घेतल्या जाणार आहेत. पण, याच दिवशी एमपीएससीच्या पोलीस उपनिरीक्षक पदांसाठी मुख्य परीक्षा आहे. यामुळे या दोन्ही परीक्षा देणा-या विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

विद्यार्थी गोंधळात 

म्हाडाने 12 ते 20 डिसेंबर 2021 दरम्यान परीक्षांचे नियोजन केले होते. मात्र यादरम्यान पेपरफुटीचे प्रकरण समोर आल्याने गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करून ही परीक्षा रद्द करण्यात आल्याची माहिती दिली होती. मात्र आता नव्या वेळापत्रकानुसार म्हाडा आणि एमपीएससीच्या परीक्षा एकाच दिवशी होणार असल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

( हेही वाचा: …तोपर्यंत राज्यात लाॅकडाऊन लागणार नाही – राजेश टोपे)

परीक्षांबाबत पुन्हा गोंधळ 

एमपीएससी आणि म्हाडा या दोन्ही परीक्षा एकाच दिवशी घेतल्या जाणार असल्याने विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. तर दोन्ही परीक्षा नियोजन करणाऱ्या संस्थांनी परीक्षांचा तारखा जाहीर करताना इतर विभागाचं वेळापत्रक लक्षात घेतलं नाही असा आरोप केला जातोय. राज्यभरात 29 जानेवारी ते 3 फेब्रुवारीदरम्यान 565 जागांसाठी म्हाडाची परीक्षा घेतली जाणार आहे. तर म्हाडा परीक्षेच्या पहिल्याच दिवशी एमपीएससीची पीएसआय मुख्य परीक्षा देखील होत आहे. त्यामुळे दोन्ही परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना एका परीक्षेला मुकावे लागणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.