पुणे महापालिका २ लाख मुलांचे करणार लसीकरण

126

आजपासून देशभरात 15 ते 18 वयोगटातील मुलांसाठी लसीकरण सुरु होत आहे, पुणे शहरातही या लसीकरण मोहिमेसाठी जय्यत तयारी करण्यात आली. पुण्यात आजपासून 40 लसीकरण केंद्रांवर 15 ते 18 वयोगयातील मुलांसाठी कोरोना लसीकरण होणार आहे. यासाठी पुणे मनपाने या वयोगटातील 2 लाख मुलांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट्य ठेवले आहे. पुण्यातील शिवाजीनगर येथील दळवी हॉस्पिटलमध्ये आज 15 ते 18 वर्षांच्या मुलांसाठी लसीकरण मोहिमेचे उद्घाटन महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते करण्यात आले.

40 लसीकरण केंद्रांवर लसीकरण होणार

मुरलीधर मोहोळ म्हणाले, कोरोनाची साथ रोखण्यासाठी केंद्र शासनाने दिलेल्या आदेशानुसार पुण्यात आजपासून 40 लसीकरण केंद्रांवर 15 ते 18 वयोगयातील मुलांसाठी कोरोना लसीकरण करण्याचे पुणे महानगरपालिकेने ठरवले आहे.
आजपासून आम्ही या मोहिमेची सुरुवात करत आहोत, असे मुरलीधर मोहोळ म्हणाले. डॉक्टर आशिष भारती म्हणाल्या, आजपासून पुण्यात आजपासून 40 लसीकरण केंद्रांवर 15 ते 18 वयोगयातील मुलांसाठी कोरोना लसीकरण होणार आहे. यासाठी पुणे मनपाने या वयोगटातील 2 लाख मुलांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट्य ठेवले आहे. त्याची सुरुवात आम्ही हॉस्पिटलमधून  करत आहोत, असे आशिष भारती म्हणाल्या. केंद्र सरकारच्या निर्देशानुसार राज्यभर मुलांच्या लसीकरणाला सुरूवात झाली आहे. पहिल्या दिवशी त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला आहे.

(हेही वाचा प्रवीण दरेकर यांचा तिन्ही पक्षांना ‘जोर का झटका…’!)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.