राज्यासह मुंबईतही कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉनच्या वाढत्या रुग्णसंख्येने पुन्हा एकदा सर्वांच्या चिंतेत वाढ केली आहे. वाढत्या रूग्ण संख्येमुळे मुंबईतील शाळांसंदर्भात महापालिकेने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. महापालिकेच्या निर्णयानुसार, मुंबईतील इयत्ता १ ली ते ९ वीच्या शाळा पुन्हा एकदा ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता ३१ जानेवारीपर्यंत पहिली ते आठवीच्या शाळा बंद राहणार आहेत.
Maharashtra | Mumbai schools for classes 1 to 9 to be closed till 31st January, in view of rising COVID19 cases. School for classes 10 & 12 to continue: Brihanmumbai Municipal Corporation (BMc)
— ANI (@ANI) January 3, 2022
ऑफलाईन शाळा बंद असल्या तरी ऑनलाईन शिक्षण सुरू
मुंबईतील शाळा १५ डिसेंबर रोजी सुरू करण्यात आल्या होत्या. त्यामुळे मुंबईतील बऱ्याच शाळांनी ऑनलाईन पद्धतीने सुरू असलेले शिक्षण बंद केले होते. मात्र पुन्हा एकदा मुंबईत कोरोनाबाधितांचा आकडा वाढू लागल्याने हा निर्णय महापालिकेकडून घेण्यात आला आहे. महापालिकेच्या या निर्णयानंतर ऑफलाईन शाळा बंद असल्या तरी देखील ऑनलाईन शिक्षण सुरू राहणार आहे. शाळा बंद राहण्याचा हा निर्णय केवळ मुंबई महापालिका अंतर्गत येणाऱ्या शाळांसाठी असणार आहे. तसेच नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना लस देण्यासंदर्भातील नियोजनाचा आढावा घेण्यासाठी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी संबंधित व्यक्तीना तातडीचे आदेश देऊन बैठकीचे आयोजन केले होते.
(हेही वाचा – ऑफलाईन शाळा बंद असल्या तरी देखील ऑनलाईन शिक्षण सुरू)
…म्हणून घेतला पालिकेने निर्णय
गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या विक्रमी वाढत आहे. हा मुंबईकरांसाठी चिंतेचा विषय ठरत आहे. त्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून लहान मुलांना ओमायक्रॉन किंवा कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून पालिकेकडून हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या शाळा नुकत्याच सुरु झाल्या होत्या. मात्र पुन्हा कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका पाहता महापालिका आयुक्त इकबाल चहल यांनी शाळांबाबत मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ऑफलाईन शाळा बंद असल्या तरी ऑनलाईन शाळा या सुरु राहणार आहेत. मात्र शाळांचे ऑफलाईन वर्ग बंद राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
Join Our WhatsApp Community