पुण्याच्या कर्वेनगर पोलीस चौकीत तरुणीचा राडा; महिला पोलिसाला बेदम मारहाण

159

पुण्याच्या कर्वेनगरमध्ये शाहु कॉलनी या ठिकाणी एक तरुणी आणि तीची आई दगड विटा आणि धारदार शस्त्राने गाड्यांची तोडफोड करत होत्या. त्यावेळी स्थानिक नागरिकांनी पोलीस कंट्रोलला फोन करून माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच वारजे पोलीस ठाण्याचे बीट मार्शल घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तरुणी आणि तिच्या आईला कर्वेनगर मधील पोलीस चौकीला आणले. त्यावेळी तरुणीने चौकीमधील दामिनी पथकातील महिला पोलिसाला शिवीगाळ करता मारहाण केली. चौकीत आलेल्या तरूणीने आरडा-ओरडा करत महिला कर्मचाऱ्यांना मारहाण केली. पोलीस अधिकाऱ्यांशी हुज्जत घालत गोंधळ घातल्याचा हा प्रकार घडला आहे. या तरूणीवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी २१ वर्षीय तरूणीवर वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत २६ वर्षीय महिला कर्मचाऱ्यांनी तक्रार दिली आहे. हा प्रकार रविवारी दुपारी घडला आहे.

असा घडला प्रकार

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार या वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात नेमणूकीस असून त्या दामिनी मार्शल पथकात ड्युटीवर आहेत. रविवारी त्यांना दुपारी कर्वेनगर पोलीस चौकीत एक तरूणी गोंधळ घालत असल्याचे पोलीस ठाण्याकडून समजले. त्यामुळे त्यांनी तेथे जाऊन या तरूणीला समजावून सांगत वारजे चौकीत आणले व तिची तक्रार दाखल करून घेतली. पण, पुन्हा ही तरूणी कर्वेनगर चौकीत गेली. तिने पोलीस माझे काहीही वाकडे करू शकत नाही, असे म्हणत गोंधळ घालण्यास सुरूवात केली. ती गोंधळ घालत असल्याने तक्रारदार महिला कर्मचाऱ्यांनी तिला समजावण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तिने महिला कर्मचाऱ्यांना मारहाण केली.

हुज्जत घालणाऱ्या तरूणीवर गुन्हा दाखल

तसेच, चौकीचे प्रभारी अधिकारी सहाय्यक निरीक्षक यांना देखील अपशब्द वापरत त्यांच्या अंगावर धावून जात त्यांच्या गणवेशाला धरून ते करत असलेल्या सरकारी कामात अडथळा निर्माण केला आहे. अधिक तपास महिला उपनिरीक्षक सोनाली कथले या करत आहेत. या प्रकरणी सुनिता ज्ञानेश्वर दळवी (वय ४५, रा. गुरुप्रसादा कॉलनी, कर्वेनगर) यांनी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी संजना किरण पाटील (वय ४०) आणि मृणाल किरण पाटील (वय २१, रा. गुरुप्रसाद कॉलनी, कर्वेनगर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.