काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे कायम स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान करत असतात, मात्र त्यांची ही कृती आक्षेपार्ह वाटत नाही, परंतू कालीचरण महाराजांचे वक्तव्य आक्षेपार्ह वाटल्याने छत्तीसगडच्या काँग्रेस सरकारला राहुल गांधी यांना अटक करावीशी का वाटत नाही, अशी विचारण सोशल मीडियावर नेटकरी विचारत आहेत. तसेच “ARREST RAHUL GANDHI” हा ट्रेंड ट्वीटरवर सुरू केला आहे.
कालीचरण महाराज यांनी मोहनदास करमचंद गांधी यांच्याविषयी केलेल्या विधानांवर छत्तीसगडमधील काँग्रेस सरकारने तत्काळ त्याची दखल घेत कालीचरण महाराजांना अटक करण्यात आली आहे. नेटक-यांनीही याच करवाईचा धागा पकडून वीर सावरकर यांचा अवमान करणा-या राहुल गांधींवर कारवाई कधी करणार, अशी विचारणा नेटकरी करत आहेत.
(हेही वाचा आमदार कारोमोरेंना अटक, पोलिसांना केली अश्लील शिवीगाळ)
हिमांशी हे त्यांच्या ट्वीटमध्ये म्हणतात की, वीर सावरकर यांचा अवमान करण्यामागील कोणतेही कारण नाही. कारण वीर सावरकर हे आघाडीचे स्वातंत्र्यसैनिक आहेत, त्यांचा आम्हाला अभिमान आहे, असे म्हटले आहे.
https://twitter.com/its_himmu/status/1477935225187418112?s=20
तर निवृत्त सेनाधिकारी जी डी बक्षी म्हणाले की, जर महात्मा गांधी यांचा अवमान केल्यामुळे कालीचरण महाराज यांना अटक करण्यात आली, तर वीर सावरकर यांचा वारंवार अवमान करणारे राहुल गांधी यांना का अटक करण्यात आली नाही, असे म्हटले.
https://twitter.com/GDBakshi2/status/1477941459298893826?s=20
रूपेश यांनी ‘जर काँग्रेस तथाकथित महात्म्याविषयी सत्य कथन केले म्हणून संताला अटक करते, तर मग वीर सावरकर यांना देशद्रोही म्हणणा-या राहुल गांधी यांच्यावर करवाई का करत नाही, असे म्हटले आहे.
If congress can arrest a sant for telling the truth about so-called महात्मा,than why should Rahul Gandhi is an exceptional for calling veer savarkar a देशद्रोही 👊
" Arrest Rahul Gandhi" https://t.co/ftGVZmzvzy pic.twitter.com/0etQTPXSSo— रुपेश *प्रशासक समिति* ✊🚩 (@RoopeshHINDU) January 3, 2022